हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठीवर एकदम भन्नाट असा डान्सिंग रिऍलिटी शो सुरु आहे. ज्याचे नाव आहे ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ लिटिल मास्टर्स. हा शो सुरु होऊन फार दिवस झाले नसले तरीही या शोने आपला दर्जा हळूहळू वाढवला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या शोची बऱ्यापैकी लोकप्रियता आहे. एकीकडे लहान लहान मुलांनी आपल्या नृत्य कलेने या शोमध्ये जान आणली आहे. तर दुसरीकडे चिंचि चेटकिणीने शोमध्ये दंगा करून मजेची लहर आणली आहे. यातच आता शोमध्ये आगामी भागात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे येणार आहे. तसा प्रोमो सुद्धा रिलीज झाला आहे.
आगामी भागात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिची माहेरवाशीण म्हणून धमाकेदार एंट्री होणार आहे. याचा एक खास प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये सोनाली चक्क चिंचि चेटकिणीसोबत पिंगा घालताना थिरकताना दिसते आहे. सोनाली आणि चेटकीण मस्त धमाल, मजा करताना दिसत आहे. या प्रोमोतील सोनाली आणि चेटकीण यांचा डान्स त्यांची जुगलबंदी कमाल आहे. या शोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता गश्मीर महाजनी परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. तर सूत्रसंचालन अभिनेता संदीप पाठक करत आहे. हा शो झी मराठी वाहिनीवर २७ जुलैपासून दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
हा प्रोमो व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच या एपिसोडची उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना सोनाली म्हणाली कि, ‘डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात येऊन परीक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. झी मराठी आणि डान्स रिऍलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिॲलिटी शो आणि तो पण झी मराठीवर करताना मला खूप आनंद होतो आहे. आताची पिढी ही मुळातच खूप म्हणजे खूपच टॅलेंटेड अहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे काही सोपं नाही हे मला माहित आहे.’
Discussion about this post