हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठमोळी सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांच्या पारंपारिक लग्न सोहळ्याच्या सिरीजची चर्चा सुरु होती. अखेर ११ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता हि सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. पण याहीपेक्षा जास्त म्हणजे या सीरिजचे शीर्षक गीत प्रेक्षकांना जास्त भावले आहे. या शीर्षक गीताचे नाव ‘तुला मी.. मला तू’ असे असून याचे बोलही अत्यंत मनाला भिडणारे आहेत.
अमेय जोग आणि प्रियांका बर्वे या सुमधुर गायकांनी हे गाणे गायले असून याचे बोल प्रशांत मडपूवार यांनी लिहिले आहेत. अतिशय सुंदर अशी शब्दरचना आहे या गाण्याची. ‘तुला मी मला तू पुन्हा आवडावे असे रोज काही घडावे’ म्हणत या गाण्याची सुरुवात होते आणि हे संगीत कधी आपल्याला गुरफटत नेते तेच समजत नाही. एकमेकांच्या सोबतीत आनंदी असलेले सोनाली आणि कुणाल यांच्यासाठीच हे शब्द रचायचे होते अशी काहीशी भावना येते. या गाण्यातील प्रत्येक शब्द एक भावना आहे आणि त्या भावनेत तल्लीन होण्यासाठी हे गाणे जरूर ऐका.
सोनाली-कुणालचा मुख्य लग्नसोहळा हा कोविड महामारी दरम्यान झाला होता. यामुळे कुणी नातेवाईक नाही मज्जा नाही. पण मग लग्नाला एक वर्ष होताच यांनी पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचे योजिले. मग मोजके नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत हा विवाह सोहळा दणक्यात पार पडला. पण याचे फोटो व्हिडीओ कुठेच शेअर केले गेले नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं लग्न कसं झालं..? याची खदखद प्रेक्षकांना राहिली होती. शिवाय चाहते नाहीत तर सोनालीच्याही मनालासुद्धा रुखरुख लागली होती ना.. म्हणूनच प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा लग्न सोहळा तुमच्या उपस्थितीने पूर्ण व्हावा यासाठी सोहळ्याचे विशेष प्रसारण केले गेले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा लंडनमधील विवाहसोहळा प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तीन भागात दाखवण्यात येत आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यात लग्न म्हणजे कसं घरभर लगीनघाई.. सनई चौघडे… झेंडूच्या फुलांच्या कलरफुल माळा… मोठा लग्न मंडप…दारात रांगोळ्या, भरजरी शालू, जरतारीच्या पैठण्या, दागिन्यांमध्ये सजलेली लाजरी नवरी आणि सोवळं नेसलेला तडफदार छातीचा नवरा… सोबत ढीगभर पाहुणे…मनभर आशीर्वाद… जेवणामध्ये श्रीखंड पुरी आणि मसाले भात.. बापरे! केव्हढा तो खटाटोप. पण लग्न आहे ना आणि लग्न तर एकदाच होतं.
म्हणूनच तुम्हीही साक्षीदार व्हा सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील अविस्मरणीय सोहळ्याचे…. पहिल्याच लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीचे.. अजूनही पाहिले नसाल तर प्लॅनेट मराठी ओटीटीवर लॉग इन करा आणि पहा सोनाली कुणालची वेडिंग स्टोरी!
Discussion about this post