हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हि ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या यशानंतर चंद्रा याच नावाने प्रसिद्ध झाली आहे. अमृता एक उत्तम अभिनेत्री असून ती एक उत्तम नृत्यांगना आहे हे आपण सारेच जाणतो. म्हणूनच ती नेहमी एका वेगळ्या संधीच्या शोधात असते आणि यावेळी आणखी एक वेगळी संधी तिला मिळाली. कलर्स हिंदीचा लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो झलक दिखला जा सीजन १०’साठी अमृताची निवड झाली. मग काय अमृताने आपला प्रवास सुरु केला. पण यावेळी तिच्या मनात धाकधूक होती ती धकधक गर्लसमोर थिरकण्याची.. त्यात जेव्हा माधुरीसोबत प्रत्यक्ष परफॉर्म करायचं होत तेव्हा आपल्या उत्कट भावना ती रोखू शकली नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त झाली.
अमृताने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करत दुसऱ्या पोस्टमध्ये शुटिंगवेळचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिले कि, ‘तो दिवस … तो क्षण माझ्यासाठी खूप अवास्तव होता … जिच्याकडे मी नेहमी नजर टाकत असे आणि कृपेच्या देवीसोबत नाचायचे … असे वाटले की माझे आयुष्य पुन्हा एका वर्तुळात आले आहे …. पुण्यातल्या त्या लहान मुलीपासून जी गणेश उत्सवात माधुरी दीक्षित यांच्या गाण्यांवर नाचायची ते स्वतः माधुरी दीक्षित नेने या आख्यायिकेसोबत परफॉर्म करण्यापर्यंत…. माझा नृत्यातील प्रवास यापेक्षा चांगला होऊ शकत नाही..तुम्ही चंद्रमुखीसाठी माझ्यावर जे प्रेम केलं आहे आणि मला अजूनही मिळत आहे त्यासोबत मी तुम्हा सर्वांना एक वचन देऊ इच्छिते की माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना मी नेहमीच माझे सर्वोत्तम प्रयत्न देईन. मी कृतज्ञतेने भरले आहे आणि दुसरे काही नाही.’
पुढे लिहिलं आहे कि, ‘ज्यांचं रूप … सौंदर्य … नृत्य अविस्मरणीय होतं .. आहे आणि राहणार अश्या माझ्या अतिशय लाडक्या अभिनेत्री माधुरी दीक्षित बरोबर मला थिरकायला मिळालं.. तुमची हि चंद्रा तिच्या चंद्रमुखी समोर नृत्य प्रदर्शन करायला सज्ज आहे. झलक दिखला जा सीजन १०’मध्ये फक्त आणि दत्त कलर्सवर.. नेहमी प्रमाणे तुमची साथ असुद्या!’ चंद्रमुखी या चित्रपटानंतर अमृताची ख्याती आणखीच वाढली आहे. यामुळे तिच्या नृत्यावर प्रेक्षकांचा अढळ विश्वास आहे. म्हणून शोमध्ये सहभागी झाल्यानंतर अमृतावर प्रेक्षकांच्या विश्वासाची एक वेगळीच जबाबदारी आली आहे.
Discussion about this post