हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीतून शिंदेशाहीचं नाव आणखीच मोठं करणारा गायक उत्कर्ष शिंदे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शिंदेशाहीच्या गाण्याची परंपरा समर्थपणे पेलत तो आपली जबाबदारी पूर्ण करतोय. उत्कर्ष एक डॉक्टर असूनही गायन, लेखन आणि संगीत दिग्दर्शन क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे. शिवाय तो एक उत्तम व्यक्ती असून नेहमीच सामाजिक भान जपताना दिसतो. अशीच एक समाजाप्रती असणारी जबाबदारी आणि भानावर आणणारी पोस्ट उत्कर्षने केली आहे.
१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. पण खर्च आपला देश स्वतंत्र झालाय का..? हा सवाल आजही अनेकांना पडलाय. तृतीयपंथी म्हंटलं की, लोक लांब पळतात, दरवाजे लावून घेतात, नाक मुरडतात. यामुळे त्यांना आपल्या समाजात काही भक्कम स्थान अजूनही मिळालेले नाही. परिणामी त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेकदा शिक्षण घेऊनही हे लोक रस्त्यावर, सिग्नलवर भिक्षा मागतात. अशावेळी काहींचा अपघाती मृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे. तर असाच एक तृतीयपंथी सोमवारी १५ ऑगस्ट रोजी उत्कर्षला भेटला आणि त्याचे विचारच बदलले. हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.
उत्कर्षने लिहिले कि, ‘आज तुला पाहिल आणि विचार बदलले. ‘जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं। वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।’ राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमी वर निस्वार्थ प्रेम असावे. आज सिग्नलला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस. तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस. कोण तू ? कुठली तू ? तू नर ? कि नारी? यावरून तुझे परीक्षण आजपर्यंत भवतालच्या बऱ्याच लोकांनी केले असेल. पण तू त्याचं उत्तर ‘तू प्रथम भारतीय’ आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून ठासून दाखवलंस.
पुढे लिहिले कि, ‘कारची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने ‘साहब भारत माता कि जय हो’ म्हणालीस आणि पैसे नहीं चाहिये आज.. आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवासभर मी तुझ्यातल्या माणुसकीला, देशप्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो. ७५’व्या स्वातंत्र्यदिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या, भेद भाव मानणाऱ्या,माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या विचारांपासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे.’
Discussion about this post