हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक रिऍलिटी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या शोने अल्पावधीतच यशाचा उच्चांक गाठला आहे. आता काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेचे हास्यवीर एका मोठ्या व्हॅकेशन ट्रीपवर गेले होते. मधल्या काही काळात या शोचं शूटिंग बंद होत. यामुळे वाहिनीवर जुनेच भाग प्रसारित होत होते. दरम्यान प्रेक्षकांमध्ये आपली हास्यजत्रा कधी परतणार…? याबाबत फारच उत्सुकता होती. अखेर पुन्हा एकदा गदगदून हसवण्यासाठी हास्यवीर १५ ऑगस्टपासून परतले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे.
जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने त्रस्त होतं तेव्हा हास्यजत्रेच्या हास्यवीरांनी लोकांना खळखळून हसवलं आणि जगण्याची उमेद दिली. त्यामुळे हा शो बघता बघता कधी लाडका झाला हे कळलंच नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ओळखला जातो. आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा चालू झाला आहे. शिवाय आठवड्यातले चारही दिवस हास्य रसिकांना हा कार्यक्रम बघता येणार आहे. या नव्या पर्वात सगळं काही एकदम नवं आणि ओक्केमधी असणार आहे.
या पर्वात रसिकांना अनेक विविधता अनुभवायला मिळणार आहे. एकदम नवीन सेट, स्कीटचे वेगवेगळे विषय, नवीन पात्रं आणि बरंच काही… पण निवेदिका.. ती कशी बदलणार…? प्राजक्ता माळी हिचं ‘वाह दादा वाह’ असं बोलताना पुन्हा एकदा दिसते आहे.
तर परीक्षकाच्या खुर्चीत हास्य रसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकरच पाहायला मिळत आहेत. शिवाय समीर चौघुले, गौरव मोरे, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, दत्तू मोरे आणि इतर हास्यवीर कलाकार आपलं टेन्शन, दुःख आणि निराशा हटवताना दिसत आहेत.. कारण पुन्हा सुरु झाली आहे आपल्या टेन्शनवरची मात्रा…’महाराष्ट्राची हास्यजत्रा’..
Discussion about this post