हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचं पुष्पा- द राईज चित्रपटातील गाजलेलं गाणं श्रीवल्ली अजूनही चांगलाच गाजतंय. या गाण्याला काही तोडच नाही असेच वाटत आहे. रिल्स म्हणू नका.. स्नेहसंमेल्लन सोहळे म्हणू नका.. या गाण्यांशिवाय अगदी वरातीलाही मजा नाही. पण मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी या गाण्याचं मराठी व्हर्जन आलं आणि मार्केट खाऊन गेलं. अमरावतीच्या विजय खंदारे यांनी या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले आणि सोशल मीडिया गाजवला. यानंतर आता विजय यांनी ‘शेवटचं पान’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. जे चांगलच चर्चेत आहे.
अमरावती प्रस्तुत विदर्भातील कलाकारांची नवीकोरी दिलावर राज करणारी कलाकृती “शेवटचं पान” हे मधुर गाणे ७ ऑगस्ट २०२२ रोजी तापडिया सिटी सेंटर येथे प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याने अगदी एका दिवसातच दीड लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले होते. लोकांनी या गाण्याला Youtube वर उदंड प्रतिसाद दिला आणि सोशल मीडियावर विविध माध्यमात हे गाणे व्हायरल केले. त्यामुळे आज इतके दिवस होऊनही हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हायरल झालेल्या शेवटचं पण या गाण्याचं दिग्दर्शन रोहित काळे तसेच मयूर बर्डे यांचे आहे. तर संगीत संयोजन श्रीनिवास मोहोड यांनी केलेले आहे. तसेच या गाण्याला गायक विनय वानखडे यांनी आपला आवाज दिला आहे. शिवाय या गाण्याचे गीतकार निखिल लिघाटे आणि विनय वानखडे हे आहेत. तसेच या गीताचे चित्रीकरण मोर्शी तालुक्यातील अंबाडा या गावी तसेच महाराष्ट्र सीमेला लागलेल्या मध्य प्रदेशातील नळा मानी या गावी झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या मुख्य भुमिकेत श्रीवल्ली गाण्याचे मराठी व्हर्जन तयार करणारे विजय खंदारे हे झळकत आहेत आणि त्यांच्या साथीला सृष्टी गाडगे, मनीष पतंगराव हे कलाकार दिसत आहेत.
Discussion about this post