हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर अतिशय सक्षम आणि भक्कम व्यक्तिमत्व आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने कोणत्याही वशिल्या शिवाय मराठी सिनेसृष्टीत आपले असे स्थान निर्माण केले आहे. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं कुणीतरी असतच ज्याच्याशिवाय त्यांचं असणं किंवा जगणं फार प्रभाव पाडत. अशी व्यक्ती आयुष्यातून अचानक निघून जाणे हे दुःख सहन करणे फार कठीण असते. अभिनेत्री अमृता खानविलकरने अशाच एका व्यक्तीला गमावले आहे. मावशी ही अशी व्यक्ती असते जी आई नसली तरीही आईपेक्षा कधीच कमी नसते. अमृताच्या मावशीचे निधन हे तिच्यासाठी चटका देणारे ठरले. मावशीच्या निधनानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
आपल्या मावशीचा फोटो शेअर करत अमृताने लिहिले आहे की, ‘आता शांत झोप माझी माऊ… आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा …. छान रहा …. नीट रहा. आणि कसलीच काळजी करू नकोस.. आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा … तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांसाठी …. आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा … मी … अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो. माऊ तुला खूप मिस करणार ग…. खूप. अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं …. मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता.. तू काळजी करू नकोस
पुढे लिहिलंय की, आज मी तुला ज्या प्रकारे पाहिलं ते पाहून माझा एक भाग सुन्न झालाय…. माझ्या मावशीपेक्षा तू माझ्यासाठी आईच होतीस…. तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून तुझ्या कुटुंबासाठी उद्या नसल्यासारख्या गोष्टी करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली…. आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये ढकलण्यापर्यंत तुम्ही नेहमीच आहात. या जगाच्या शेवटपर्यंत मला तुझी आठवण येईल, आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद माऊ.. मला माहित आहे की तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आहात जिथे तुम्ही शेवटी शांततेत विश्रांती घेऊ शकता.. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन.. पुनश्च – मम्माची काळजी करू नकोस तुला माहीत आहे मी काळजी घेईन.. RIP माऊ.
Discussion about this post