हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे आपल्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. अगदी तिचा दिनक्रम, चित्रपट आगामी प्रोजेक्ट अस सगळ काही ती आपल्या चाहत्यांना नेहमीच विविध पोस्टच्या माध्यमातून सांगत असते. सध्या प्राजक्ता आपल्या कुटुंबासोबत मस्त वेळ घालवत आहे आणि यामध्ये ती कुटुंबासोबत शिखर शिंगणापूरच्या महादेवाला गेली होती. तेव्हाचा व्हिडिओ तिने शेअर केलाय.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोमवारी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात स्थित असलेल्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाला गेली होती. श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ती येथे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत गेली होती. त्याचं काय आहे दरवर्षी प्राजक्ताचे कुटुंबिय श्रावणामध्ये या मंदिरात येतात आणि महादेवाचं दर्शन घेतात. ही आमच्या घराची परंपरा आहे असं सांगत प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात महादेवाचं दर्शन घेताना प्राजक्ता दिसत होती. ही एक व्हिडिओ पोस्ट आहे आणि याच्या कॅप्शनमध्ये प्राजक्ताने लिहिलं आहे की, ‘योगी- महादेव. श्रावण महिन्यात शिखर शिंगणापूर – महादेवाचं दर्शन. ही घराची परंपरा. काल सोमवारचा मुहूर्त गाठून साळकाय – म्हाळकायसह (आई- मावशी किंवा याज्ञा- शिवा काहीही घ्या) दर्शन घेतलं.’
अभिनेत्री प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. मुख्य म्हणजे प्राजक्ताची देवावर आणि दैवी गोष्टींवर प्रचंड श्रद्धा आहे हे या व्हिडिओतून समजत आहे. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतोय आणि आतातर याचं नवं पर्व सुरू झालं आहे.
Discussion about this post