Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जोशींची लेक झाली कुलकर्णींची सून’; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुपचूप विवाह संपन्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Neha_Omkar
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून सिने इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार एकापाठोपाठ एक लग्न करताना दिसत आहेत. आता जो तो आपल्या आपल्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकत आहे. अलीकडेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाचा धुमधडाका मोठ्या जोरोशोरोसे सगळ्यांनीच अनुभवला. याशिवाय सुयश टिळक, रसिका सुनील धबडगावकर,रुचिता जाधव, आस्ताद काळे, अभिज्ञा भावे आणि अजून बऱ्याच कलाकारांची लग्न गेल्या काही काळात झाली. या प्रत्येकाच्या लग्नात सनई चौघडे असा फुल्ल राडा होता. पण अभिनेत्री नेहा जोशीने अगदी गुपचूप काहीही धिंगाणा न करता आपलं लग्न आटपलं आहे आणि त्याचे फोटो आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.

https://www.instagram.com/p/ChWReyJqtXZ/?utm_source=ig_web_copy_link

मराठी अभिनेत्री नेहा जोशी आणि गीतकार ओमकार कुलकर्णी यांनी थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपले लग्न झाल्याची माहिती दिली आहे. अतिशय साध्या पद्धतीने, अत्यंत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मात्र पूर्ण पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

https://www.instagram.com/p/ChU6A-sJdZf/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर घरच्यांच्या संमतीने कोणताही गाजावाजा न करत नेहा आणि ओमकार लग्न बंधनात अडकले आहेत. नेहाने आपल्या स्व कर्तृत्वावर सिने इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. तर ओमकार हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. काही नाटक आणि लघु पटांचे लेखन त्याने केले आहे. नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकाचेही लेखन त्याचेच असून यात सुमित राघवन आणि नेहा जोशी एकत्र झळकले आहेत. या नाटकामुळे नेहा आणि ओमकारची ओळख झाली असे बोलले जाते.

View this post on Instagram

A post shared by Neha Joshi (@joeneha)

नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही क्षेत्रात पात्र किती लहान, किती मोठे, किती मिनिटांचे हे न पाहता लीलया साकारणारी अभिनेत्री नेहा जोशी हि प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. त्यामुळे नेहाचं लग्न झालं हि अतिशय मोठी बातमी ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Neha Joshi (@joeneha)

सध्या सोशल मीडियावर नेहा आणि ओंकारच्या लग्नाचे त्यांनी शेअर केलेले काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नेहाने गर्द निळ्या रंगाची साडी तर ओंकारने अतिशय साधा शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. तूर्तास या नवं दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Instagram PostMarriage PhotosNeha JoshiOmkar KulkarniViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group