Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टकाटक 2’मध्ये सदाबहार ‘हृदयी वसंत फुलताना…’ गाण्याला दिलाय ग्लॅमरचा तडका; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Takatak 2
0
SHARES
8
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचविलेला भन्नाट आणि सदाबहार चित्रपट म्हणजे ‘अशी हि बनवा बनवी’. हा चित्रपट २३ सप्टेंबर १९८८ साली प्रदर्शित झाला होता आणि हा सुपर डुपर हिट सिनेमा ठरला. या चित्रपटाचे केवळ कथानक नव्हे तर चित्रपटातील गाणीदेखील एव्हरग्रीन ठरली आहेत. यातील हृदयी वसंत फुलताना हे गाणे तर प्रचंड गाजले. या चित्रपटाला ३३ वर्ष होऊन गेल्यानंतर आजही हि गाणी लोकांना तोंडपाठ आहेत. यानंतर आता हे गाणं अतिशय ग्लॅमरस अंदाजात टकाटक २ या आगामी मराठी चित्रपटात शूट करण्यात आलं आहे. नुकताच याचा व्हिडीओ रिलीज झाला असून व्हायरल झाला आहे.

 

तरुणाईला वेड लावणारं गाणं एका वेगळ्या अंदाजात प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकही थोडे अवाक झाले आहेत. ईराणी- जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजी या गाण्यात थिरकताना दिसते आहे. या गाण्याला एका वेगळ्या अंदाजात प्रेझेंट करायचा एक बरा प्रयत्न केलाय असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये एका दिमाखदार सोहळ्यात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचं नवं रूप प्रेक्षकांसमोर आणण्यात आलं. यासाठी निर्मात्यांनी अगोदर ९० सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते. मात्र पब्लिक डिमांडमुळे हे संपूर्ण गाणे रिलीज केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टकाटक २’ या चित्रपटात ‘हृदयी वसंत फुलताना…’ या गाण्याचा समावेश केल्यामुळे चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढली आहे. हे गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या गाण्यामध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, कोमल बोडखे दिसत आहेत. गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याचे पुर्नलेखन केले आहे. तर गाण्याला गायिका श्रुती राणेचा आवाज लाभला आहे आणि संगीतकार वरुण लिखते यांचे संगीत लाभले आहे. राहुल संजीर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. बोल्ड कथानक असणारा ‘टकाटक २’ हा चित्रपट आजपासून महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

Tags: New Song ReleasePrathmesh ParabTakatak 2Viral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group