Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिपवीर झाले अलिबागकर! नव्या घरात केला गृहप्रवेश; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
DipVeer
0
SHARES
20
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे अतिशय ट्रेंडिंग कपलं आहे. मुळात दोघेही अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग अफाट आहे. त्यामुळे रणवीर दीपिकाच्या आयुष्यात काय चालू आहे यामध्ये लोकांना भारी इंटरेस्ट असतो. माहितीनुसार, दिपवीर लग्न झाल्यापासून मुंबईतच राहत आहेत. पण आता दोघेही अलिबागमध्ये स्थायिक होणार असे दिसत आहे. कारण नुकतेच त्यांनी अलिबागमध्ये नवं घर घेतलं असून गृहप्रवेश पूजा संपन्न केली आहे. दरम्यान या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

अभिनेता रणवीर आणि दीपिका यांनी अलिबागमधील मापगाव या भागात काही दिवसांपूर्वीच जवळपास २२ कोटींमध्ये जागा खरेदी केली होती. या जागेवर त्यांनी सुंदर असं स्वप्नातलं घर बांधलं आणि आज गृहप्रवेशसुद्धा केला. रणवीरने त्याच्या इंस्टा स्टोरीवर या गृहप्रवेश पूजेची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये दीपिका दिसत नसली तरी बाकीचे कुटुंबीय दिसत आहेत. माहितीनुसार या पूजेसाठी रणवीर आणि दीपिकाचे कुटुंबीय उपस्थित होते. या पूजेसाठी रणवीर आणि दीपिका दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

व्हायरल फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका दोघेही गृह्प्रवेशाच्या धार्मिक विधी करताना दिसले. मात्र यामध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीत. फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका त्यांच्या नव्या घराचा दरवाजा उघडताना दिसत आहेत. रणवीरने कॅप्शनमध्ये जोडलेले हात आणि घर असे इमोजी शेअर केले आहेत.

या वर्षी जुलै महिन्यात रणवीर आणि त्याचे वडील जुगजीत भवनानी यांनी ११९ कोटी रुपयांना मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केल्याचीदेखील माहिती मिळत आहे. यानुसार सध्या दीपिका आणि रणवीर हे कपलं श्रीमंत कपल्सच्या यादीत स्थानापन्न झाले आहे असेच दिसून येत आहे.

Tags: Dipika PadukoneInstagram Postranveer singhTrending CoupleViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group