हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी वाहिन्यांच्या रेसमध्ये सोनी मराठी वाहिनीदेखील एकदम चुरशीची लढत देत आहे. सोनी मराठीवरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. या मालिकांच्या माध्यमातून हि वाहिनी घराघरात लोकप्रिय होत आहे. मुख्य म्हणजे मनोरंजनाची अचूक वेळ हे सोनी मराठीचं खास आणि मुख्य वैशिष्ट्य आहे. आता सोनी मराठीने एक गोष्ट चांगलीच हेरली आहे आणि ती म्हणजे प्रेक्षकांना पडद्यावरील गोष्टी जेव्हढ्या प्रिय आहेत तेव्हढीच उत्सुकता त्यांना पडद्यामागील गोष्टींबाबतही असते. म्हणूनच आता पडद्यामागची धमाल घेऊन सोनी मराठी एक नवी मालिका आणतेय.
प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर आणि कलाकारांवर प्रेम करतात. तर पडद्या मागे दडलंय काय यात नेहमीच व्यस्त असतात. म्हणून सोनी मराठी वाहिनी येत्या २१ ऑगस्ट २०२२ पासून दर रविवारी ‘गॉसीप आणि बरंच काही’ हि विशेष मालिका घेऊन येते आहे. या मालिकेमधून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती, राडा, गप्पा आणि वेडेपणा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीने हा कार्यक्रम केवळ आणि केवळ प्रेक्षकांचा विचार करून तयार केला आहे असे मेकर्सने सांगितले आहे.
नवनवे कार्यक्रम आणि नेहमी कमालीचं मनोरंजन घेऊन सोनी मराठी प्रेक्षकांच्या सानिध्यात राहताने दिसते. आजकाल सेलिब्रिटी कलाकार पडद्यामागचे धमाल इंस्टा किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवतात. पण तात्पुरती मजा प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवते. म्हणून हा कार्यक्रम मालिकांच्या पडद्यामागच्या गमतीजमती घेऊन येत आहे. या कार्यक्रमामध्ये मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकेतल्या कलाकारांपैकी एक सूत्रसंचालक होईल आणि पडद्यामागची मजामस्ती प्रेक्षकांसह शेअर करेल. उद्या २१ ऑगस्टच्या रविवारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या कलाकारांचा ‘गॉसीप आणि बरंच काही’ मध्ये सहभाग असणार आहे.
Discussion about this post