हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा आगामी चित्रपट ‘एमरजन्सी’ सोशल मीडियावर भारी चर्चेत आहे. कारण या चित्रपटात स्वतः कंगना भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आव्हानात्मक भूमिका साकरणार आहे. देशातील ‘आणीबाणी’ या अत्यंत मोठ्या राजकीय घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.
या चित्रपटात कंगना फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर या चित्रपटाची दिग्दर्शिका म्हणून देखील काम पाहणार आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी फार स्पेशल आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील एक एक पात्र आता उघड होत आहे. नुकत्याच मिळालेल्या अपडेटनुसार, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्या आणि लेखिका पुपुल जयकर यांची भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी साकारणार आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपटाचे नवे कोरे पोस्टर शेअर करून त्यासोबत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. कंगनाने लिहिले आहे कि, ‘त्याकाळी घडलेल्या सर्व घटनांची एक महत्वाच्या साक्षीदार, म्हणजे आयर्न लेडी पुपुल जयकर…’. कंगनाची हि पोस्ट अभिनेत्री महिमा चौधरीने शेअर केली आहे आणि सोबत एक कॅप्शन लिहिले आहे. तिने म्हटलंय कि, ‘एका दिग्गज व्यक्तीमत्वाची हि भूमिका साकारताना अत्यंत आनंद होत आहे. हि जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल कंगना रनौतचे खूप आभार. तिच्या सोबत काम करणं हा एक वेगळा अनुभव आहे.’ एका मोठ्या ब्रेकनंतर महिमा चौधरी पुन्हा एकदा कमबॅक करतेय त्यामुळे तिचे चाहते अत्यंत खुश आहेत.
याआधी चित्रपटातील मुख्य भूमिका भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रनौत दिसणार हे पोस्टरमधून सांगण्यात आले होते. यानंतर अभिनेता अनुपम खेर यांचा लूक पोस्टरद्वारे रिलीज करण्यात आला होता.
ते या चित्रपटात दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेता श्रेयस तळपदे हा भाजप नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकरणार आहे.
यानंतर आता क्रांतीकारी लेखिका पुपुल जयकर यांच्या पात्राची एंट्री झाली आहे आणि ही भूमिका अभिनेत्री महिमा चौधरी साकारणार आहे. तसे पोस्टर रिलीज झाले असून या पोस्टरवर चाहते मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत आहेत.
Discussion about this post