हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कमी वेळात जास्त प्रसिद्ध मिळवणारी यशस्वी अभिनेत्री आहे. सध्या अत्र तत्र सर्वत्र तिच्या कारकिर्दीची चर्चा सुरु आहे. गेल्या काही काळात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा कठोर संघर्ष चालू असल्याचे दिसले. मात्र तरीही या संघर्षाच्या काळात आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक असा दोहो बाजूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. आलियाच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. पण त्यानंतर आलियाचा ओटीटीवर रिलीज झालेला ‘डार्लिंग्स’ काही फारसा चालला नाही. शिवाय आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबत समजताच ती प्रचंड ट्रोलदेखील झाली. याच ट्रोलिंगवर तिने मौन सोडले आहे.
प्रेग्नेंसी आणि चित्रपट अशा विविध कारणांवरून अनेकदा नेटकरी सेलिब्रिटींवर टीका करत असतात. याच ट्रोलिंगबद्दल बोलताना अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली कि, ‘चित्रपटांमधून ट्रोलिंगसारख्या गोष्टींना उत्तम उत्तर देता येऊ शकते. म्हणूनच मी चालू ट्रोलिंगला फारसं महत्व देत नाही आणि प्रतिसादसुद्धा दिला नाही. स्वतःला वाईट वाटण्यापासून वारंवार थांबवले. हो मी मान्य करते कि ट्रोलिंगमुळे मलाही नक्कीच वाईट वाटले. परंतु, ज्या कामासाठी आपल्याला प्रेम आणि आदर मिळतो त्या कामासाठी वाईट वाटणे ही एक छोटीशी किंमत आहे.’
पुढे म्हणाली, ‘मी गंगुबाई काठियावाडीसारखा चित्रपट प्रेक्षकांना आणि ट्रोलर्सला दिला. मग शेवटी हसण्याची संधी कोणाला मिळाली.. ? जोपर्यंत मी फ्लॉप चित्रपट देत नाही.. तोपर्यंत हसत राहीन. मी शब्दात कुणालाच उत्तर देऊ शकत नाही. पण जर मी तुम्हाला आवडत नसेन तर माझ्याकडे पाहू नका इतकं सांगेन. मी काहीही करू शकत नाही. लोकं काही ना काही बोलत राहतीलच. पण मी चित्रपटांद्वारे लोकांना हे सिद्ध करेन की माझ्याकडे असलेल्या स्थानासाठी ती पूर्णपणे पात्र आहे.’
Discussion about this post