हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री सायली संजीव हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती विविध स्टोरी आणि पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. मध्यंतरी ‘झिम्मा’ चित्रपटाच्या निमित्ताने सायलीची उथळ आणि मस्तीखोर बाजू सगळ्यांनी पाहिली. तर बाबांच्या निधनावेळी तिची भावनिक बाजूही आपण पाहिली. नात्यांच्या बाबतीत हळवे असणे फार साहजिक आहे. त्यात जर गोष्ट मायेच्या घोंगडीची असेल तर..? तर भावनांचा वेग दुप्पट होतो. अशीच अनुभूती सध्या सायलीने घेतली आहे. आज्जी आणि आई यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. म्हणूनच सायलीने त्यांच्या जुन्या साड्यांची गोधडी शिवून घेतली आहे.
अभिनेत्री सायली संजीवने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आज्जी आणि आईच्या जुन्या साड्यांची गोधडी शिवून घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडतो आहे. हि गोधडी उघडून ती अंगावर घेतानाही दिसत आहे. तिने या व्हिडीओ पोस्टसोबत एक अतिशय सुंदर आणि भावनिक असे कॅप्शन दिले आहे. तिने या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘चिंध्या चिंध्या जमवीत.. आई आयुष्य वेचते.. खरखरीत हाताने.. मऊ मऊ गोधडी शिवते’… माझी आई आणि आज्जीच्या जुन्या साड्यांची दुसरी ‘गोधडी’ माझ्या हाती आली. साडीचे काठ म्हणा, पदर म्हणा चौकोनी शिवून गोधडीला सुंदर आकार आला. कितीही थंडी असली तरी आईच्या साडीची गोधडी अंगावर घेतली की उब जाणवतेच. @motherquilts_india @ghongadi_india
सायलीने हि घोंगडी मदरक्विल्ट्स आणि घोंगडी डॉट कॉम या सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून शिवून घेतली आहे. हे सांगताना तिने लिहिले कि, ‘मदरक्विल्ट्स आणि घोंगडी डॉट कॉम हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याच्याद्वारे हातावर पोट असलेल्या 9 राज्यातील 360 पेक्षा जास्त गोधडी आणि घोंगडीच्या ग्रामीण कलाकारांना 19 देशात बाजारपेठ मिळवून देऊन आपली पारंपरिक कला जपण्याचा प्रयत्न निरज बोराटे या एका मराठी तरुणाकडून केला जात आहे. निरजला अमेरिकास्थित सामाजिक संस्थेचा ग्लोबल चेंजमेकर, लोकसत्तेचा तरूण तेजांकित, देशपांडे फाऊंडेशन, हुबळीचा इन्स्पायरिंग लीडर यांसारखे विशेष सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.’
Discussion about this post