हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या मालिकांपैकी लोकप्रिय मालिका ‘जीव माझा गुंतला’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक असे काही ट्विस्ट येत आहेत कि बस्स. सध्या मालिकेत अंतरा आणि मल्हारच्या विरोधात कटकारस्थानं करणारी चित्रा काकी, काका आणि श्वेता तुरूंगातून परतले आहेत. हे एक संकट परतून आलं असतानाच आता अंकी एक वादळ घोगावतंय. हे वादळ म्हणजे या मालिकेत नव्याने एंट्री झालेला मेघ. होय. मल्हार – अंतराच्या आयुष्यात एका नव्या वादळाची एंट्री झाली आहे. मेघचा नक्की हेतू काय आहे..? इथून ते त्याला नक्की काय सध्या करायचं आहे..? तो काय डाव रचतोय..? आणि का रचतोय..? याची उत्तरं मिळेपर्यंत हे वादळ काय काय विस्कटून जाईल काहीच सांगू शकत नाही.
या मालिकेतील मेघ या पात्राची नवीकोरी एंट्री प्रेक्षकांसाठीही सरप्राईज आहे. या मालिकेत मेघची भूमिका अभिनेता बिपीन सुर्वे साकारतो आहे. बिपीन या भूमिकेविषयी व्यक्त होत म्हणाला कि, ‘जीव माझा गुंतला.. या मालिकेमधून एका अनोख्या आणि दमदार भूमिकेमध्ये मेघ खानविलकर म्हणून मी तुमच्या भेटीला येतोय. खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण, मल्हार आणि अंतरा यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेवर त्यांचं खूप प्रेम आहे. एक स्टायलिश पात्र साकारण्याची संधी मला ‘टेल अ टेल’ प्रोडक्शन आणि ‘कलर्स मराठी’ यांच्यामुळे मिळाली. ज्या पद्धतीने हे पात्र समजावून त्याचे महत्त्व सांगितल गेलं, ह्या नकारात्मक पात्राची त्याच्या कुटुंबाशी असलेली द्वेषाची भावना, भावा बद्दल सुडाची भावना ह्या सगळ्या गोष्टींमुळे भूमिकेचा प्रेमात पडलो आणि लगेच तयार झालो. माझा मालिकेचा प्रवास ‘ई टीव्ही’ मराठीच्या सुंदर माझे घर या मालिकेपासून सुरू झाला. मुख्य म्हणजे तेव्हाही मी नकारात्मक भूमिकेत होतो.’
पुढे म्हणाला कि, ‘मेघ या पात्राबद्दल जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा त्याच दरम्यान मला काही ठिकाणी प्रमुख आणि सकारात्मक भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. तेव्हा मीसुध्दा चांगल्या संधीच्या आणि चॅलेंजिंग पात्राच्या शोधात होतो. पण मेघ खानविलकर या पात्राची ऑडिशन देताना मी स्वतःच त्याच्या प्रेमात पडलो आणि त्याच्या बद्दल पूर्ण माहिती मिळाली तेव्हा हिरोसारखी विलनची एंट्री धमाकेदार असणार आहे हे ऐकून माझी उत्सुकता खूप वाढली. पात्र नकारात्मक असलं तरी त्यामध्ये खूप वेगवेगळे पदर आहेत आणि खूप मोठी आव्हानं आहेत. यात खूप ऊर्जा आहे. हे पात्र साकारताना मला खूप मजा येतेय. खूप शिकायला मिळतंय. या पात्राला मी योग्य तो न्याय देण्याचा पुरेपूर आणि क्षणोक्षणी प्रयत्न करतोय. हे पात्र नकारात्मक आहे पण सकारत्मकतेने तुम्हाला आवडेल असा माझा प्रयत्नं असेल.’
Discussion about this post