हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय असणारा वादग्रस्त शो बिग बॉस मराठीचा चौथा सीजन लवकरच सुरु होत आहे. गेल्या काही काळात या शोचे सूत्रसंचालन कोण करणार..? यावर बरीच चर्चा झाली. पण शेवटी वर्ष बदलतं, विद्यार्थी बदलतात पण.. प्रिन्सिपल काही बदलत नाही याचा प्रत्यय आला आहे. कारण यंदाच्या चौथ्या सिजनचे होस्टींगसुद्धा ‘द महेश मांजरेकर’ करणार आहेत. तसा प्रोमोसुद्धा रिलीज झाला. यानंतर आता उत्सुकता आहे ती हा शो कधी सुरु होणार आणि यात स्पर्धक म्हणून कोण येणार याची. तर फार वेळ न घालवता या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
० सूत्रसंचालक तर ठरला… पण आता स्पर्धकांचं काय…?
बिग बॉस मराठी हा शो महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पाहिला जाणारा लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी येतात आणि मनोरंजन, राजकारण, समाजकारण अशी सगळीच क्षेत्र एकत्र ढवळून निघतात. मोबाइलशिवाय कधीही न घालवलेले ते १०० दिवस घरातील स्पर्धकांना बरंच बदलून टाकतात. घरात जाणारा स्पर्धक बाहेर येतो तेव्हा काही वेगळाच असतो.
या घरात भांडणे, प्रेम, स्पर्धा आणि एकमेकांचा गेम हे ठरलेलं समीकरण आहे. त्यामुळे या घरातील स्पर्धक जेव्हढे भांडतात तेव्हढेच एकमेकांवर जीव सुद्धा ओवाळून टाकतात. म्हणून प्रेक्षकांना नेहमीच स्पर्धक कोण असणार याबाबत उत्सुकता असते. तर सध्या संभाव्य स्पर्धकांची नावे सावर आली आहेत. यामध्ये खालील कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
१) शुभांगी गोखले
२) अलका कुबल
३) माधव अभ्यंकर
४) किरण माने
५) प्राजक्ता गायकवाड
६) हार्दिक जोशी
७) नेहा खान
८) सोनल पवार
९) कार्तिकी गायकवाड
१०) यशोमन आपटे
११) निखिल चव्हाण
१२) दीप्ती लेले
१३) ओमप्रकाश शिंदे
१४) अनिकेत विश्वासराव
१५) शर्वरी लोहकरे
१६) रुचिरा जाधव
तूर्तास या कलाकारांच्या नावाचा या संभाव्य यादीत समावेश असून हा शो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होऊ शकतो. कारण नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कि, सध्या ‘सुर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे नक्कीच ‘सूर नवा ध्यास नवा’ संपल्यानंतर साधारण २५ सप्टेंबरच्या आसपास ‘बिग बॉस मराठी ४’ सुरू होऊ शकतो.
Discussion about this post