हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अर्थात लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने नेहमीच नेटकऱ्यांना घायाळ करत असते. त्यात ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे आठवड्यातून किमान दोनवेळा तरी ती सौंदर्याचं मायाजाळ टाकतेच. तिचे विविध फोटोशूट आणि व्हिडीओ सगळ्यांनाच आवडतात. सोशल मीडियावर तीच फॅनफॉलोईंग प्रचंड असल्यामुळे तिची एकही पोस्ट अशीच सुटत नाही. अलीकडेच तिची वेडिंग स्टोरी प्लॅनेट मराठीवर रिलीज झाल्यामुळे ती आणखीच चर्चेत आली आहे. पण सध्या तीच सोशल मीडियावरील गुलाबी फोटोशूट जास्त चर्चेत आलं आहे. शिवाय यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहेत.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसते आहे. सोनालीने गुलाबी आणि फिकट गुलाबी असं कॉम्बिनेशन असणारा लॉन्ग गाउन परिधान केला आहे. सोबत गुलाबी रंगाची सॅन्डलसुद्धा मॅचिंग केली आहे. इतकेच नव्हे तर तिने कानात उंची डायमंड इअर रिंग परिधान केले आहेत. यामुळे तिचा लूक फारच आकर्षक वाटतो आहे. त्यात आणखी गुलाबी वातावरण बनविण्यात बॅकड्रॉपचाही हात आहे.
सोनालीने शेअर केलेल्या या फोटोशूटवर अनेक चाहते आणि नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच काय तर सोनालीच्या आईनेही या फोटोशूटवर कमेंट केली आहे. सोनालीची आई सावि कुलकर्णी यांनी कमेंट करत लिहिले आहे कि, ‘खूपच सुंदर’.
तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘हाय ब्युटीफुल’. शिवाय एका नेटकऱ्याने तर तिला केक म्हटलं आहे. त्याने कमेंट केलीये कि, ”तू केक वाटत आहेस’. ‘परी म्हणू की सुंदरा’ अशीही एकाने कमेंट केली आहे. आणखी बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट करताना हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केल्या आहेत.
Discussion about this post