Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गणपती बाप्पा मोरया! रवी जाधव यांनी स्वहस्ते घडवला इको फ्रेंडली गणेश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ravi Jadhav
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अवघ्या दोन चार दिवसांवर बाप्पाच आगमन आल आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. जो तो बाप्पाची सुबक मूर्ती, मखर, सजावट, लायटिंग, तोरण अशा विविध तयारीत मग्न आहे. बाप्पा येणार ही भावनाच काही और असते. गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी मंडळींकडे देखील बाप्पाच जल्लोषात आगमन होत. यात काही बॉलिवूड तर काही मराठी कलाकारांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार समाजाचं देणं लागतात आणि त्यामुळे यांचा कल हा इको फ्रेंडली गणेशोत्सवाकडे असतो. अलीकडेच गायक राहुल देशपांडे यांचे इको फ्रेंडली गणेश साकारतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

नटरंग, टाइमपास, बीपी अशा अनेक दर्जेदार कलाकृती साकारणारे दिग्दर्शक रवी जाधवदेखील गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. यंदा त्यांची स्वतःच्या हाताने जाधवांचा गणराज घडवला आहे. होय. इतकंच नव्हे तर आपला बाप्पा घडविताना त्यांच्या मनी जागलेल्या भावना त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. या सुंदर क्षणांचा एक व्हिडिओ त्यांनी अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबत एक मनाला भावणारं अस कॅप्शनदेखील लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘आपला बाप्पा आपणच घडविण्याइतका दुसरा आनंद नाही!!! गणेशोत्सवाचे मंतरलेले १० दिवस आता जवळ आले आहेत. संपुर्ण महाराष्ट्राप्रमाणे आमचीही तयारी जोरात सुरु आहे. अजून रंगकाम बाकी आहे. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!! गणपती बाप्पा मोरया,’

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत आघाडीचे दिग्दर्शक अशी ख्याती असलेले रवी जाधव यांच्याकडे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. विशेष सांगायचं झालं तर, केवळ यंदा नव्हे तर दरवर्षी ते स्वतः आपल्या घरचा बाप्पा स्वहस्ते घडवतात. त्यामुळे हा आनंद हा हर्ष ते प्रत्येक वर्षी अनुभवतात. सध्या त्यांचा हा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि नेटकऱ्यांना प्रचंड भावलाही आहे. या व्हिडिओची खास बात म्हणजे, बाप्पा जरी रवी जाधव घडवीत असले तरीही आनंद हा व्हिडिओ पाहणाऱ्यालाही होतोय.

Tags: Ganeshotsav 2022Instagram Postmarathi directorRavi JadhavViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group