हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही काळापासून अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकचे नाव हे प्रचंड चर्चेत आहेत. या गेल्या काही महिन्यांच्या काळात त्याने एकामागोमाग एक जबरदस्त कलाकृती सिनेसृष्टीला दिल्या आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे कथानक आणि गाणी तर प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून गेले. तर प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने आनंद दिघे यांना पुन्हा आपल्या माणसांना भेटवलं. या दोन्ही चित्रपटांमधून प्रसाद ओकने प्रेक्षक जिंकले. यानंतर आता प्रसादने लेखन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
‘धर्मवीर’ हा चित्रपट त्याच्यासाठी विशेष होता आणि म्हणून त्याचा या चित्रपटाशी जोडलेला प्रवास त्याने पुस्तक रूपात आणायचे योजिले होते. अखेर त्याने ‘माझा आनंद’ या त्याच्या पहिल्या पुस्तकाची आज घोषणा केली आहे.
अभिनेता प्रसाद ओक याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एकाचवेळी दोन फोटो आहेत. एका फोटोत ‘माझा आनंद’ या पुस्तकाचा फोटो त्याने शेअर केलाय. तर दुसऱ्या फोटोत त्याने आनंद दिघे यांचा फोटो शेअर केलेला दिसत आहे. या फोटोंसोबतसोबत प्रसादने एक कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिलंय की, ‘मा. दिघे साहेबांना, विनम्र अभिवादन…!!! लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!! जय महाराष्ट्र…!!!”
प्रसाद ओक यांच्या ‘ माझा आनंद ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केले आहे. तर अक्षर सुलेखन सचिन गुरव यांनी केले आहे. तसेच शब्दांकन प्रज्ञा पोवळे यांनी केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसाद लेखन क्षेत्रात अग्रेसर झालं आहे. त्याच हे लेखन क्षेत्रातील पदार्पण त्याला उंच यशाच्या टोकावर नेऊदे अश्या विविध प्रकारे शुभेच्छांचा वर्षाव या पोस्ट वर होतो आहे. तूर्तास या घोषणेनंतर या पुस्तकात नेमकं काय असणार आहे…? हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे…? अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. याबाबत वेळोवेळी माहिती देईन असे प्रसाद ओकने सांगितले आहे.
Discussion about this post