हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या हटके अंदाज, मादक सौंदर्य आणि निखळ हास्यामुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती आपल्या १० वर्षाच्या मुलामुळे चर्चेत आहे. याचे कारण ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा वयाच्या दहाव्या वर्षातच बिजनेसमॅन झाला आहे. होय. त्याने नुकताच स्वतःचा स्टार्टअप सुरु केला असून याची माहिती स्वतः शिल्पा शेट्टीने दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने ही माहिती दिली.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी मुलाचा बिजनेस मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियावर याबाबत आनंद व्यक्त करत मुलाचे कौतुक केले आहे. तीने व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शनही दिले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझा मुलगा विआन राजचा पहिला आणि अनोखा व्यावसायिक उपक्रम @vrkickss. ‘कस्टमाइज्ड स्नीकर्स’, लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. कल्पनेपासून ते उपक्रमापर्यंत, डिझाइन आणि अगदी व्हिडिओपर्यंत सर्व काही त्यांनी केले आहे. उद्योजक आणि डायरेक्टर हे किती आश्चर्यकारक आहे. इतक्या लहान वयात त्याने यामधील काही उत्पन्न दान करीन असे वचन दिले आहे.’
शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे याच माध्यमातून तिने पोस्ट लिहित आपल्या दहा वर्षाच्या मुलाच्या स्टार्टअपविषयी सांगणे पसंत केले. यात तिने वियानच्या कौतुकाशिवाय त्याच्या बिजनेसविषयी बरीच माहिती दिली आहे. तिने सांगितलं आहे कि, वियानने कस्टमाइज्ड स्नीकर्स बनवले आहेत. वियान राज कुंद्रा याने आपल्या ब्रँडचे नाव VRKICKS आणि Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या बिजनेसमध्ये तो कस्टमाइज्ड शूज, कपडे आणि बॅग यांचे उत्पादन घेणार आहे. शिवाय या उत्पादनाची किंमत ४९९९ पासून पुढे सुरु होईल. यामधून जे उत्पादन निघेल ते शिल्पा शेट्टी फाउंडेशनसाठी जाणार असल्याचेही तिने सांगितले आहे.
Discussion about this post