हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सौंदर्यवतींची काहीच कमी नाही. शुद्ध आणि मनमोहक सौंदर्य असणाऱ्या अनेक अभिनेत्रींनी आजवर मराठी सिनेइंडस्ट्री अक्षरशः गाजवली आहे. यामध्ये सिने अभिनेत्रींप्रमाणे मालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे बरं का. ‘जय मल्हार’ मालिकेतील बानू तुम्हाला आठवत असेलंच. सहज, सावळी पण सुंदर अशी बानू साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा केसकरचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. बानू या पात्राने तिला प्रकाश झोतात आणलं आणि त्यानंतर ईशाने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. सध्या सोशल मीडियावर तिचे काही मनमोहक फोटो व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री ईशा केसकर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे अनेकदा विविध अंदाजात फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसह शेअर करत असते. असंच एक मनाला भुरळ घालणारं फोटोशूट तिने मीडियावर शेअर केलं आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची फ्लोरल प्रिंट असणारी साडी परिधान केली आहे. मोकळे केस आणि केसात जास्वंदाचं फुल तिनं माळलंय. तिचा हा लूक अतिशय घायाळ करणारा आहे. या फोटोशूटवर न जाणे कित्येक नेटकरी फिदा झाले आहेत. ईशाने हे फोटोशूट शेअर करताना एक भारी कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय कि, ‘ऐसे भी आजाद ना कर… की कैद हो जाये’. हाये.. चाहत्यांना विरघळण्यासाठी तर एव्हढंच पुरेस आहे.
या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने अगदीच शायराना अंदाजात लिहिले आहे कि, ‘इस शहर के बादल तेरी ज़ुल्फों की तरह है, जो आग़ तो लगाते है पर बुझाने नहीं आते’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, खूपच गोड. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘आई शपथ लय भारी दिसतेस’.
अभिनेत्री ईशा केसकरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. झी मराठीच्या ‘जय मल्हार’ मालिकेत तिने बानूची भूमिका साकारली होती. ती अतिशय सुंदर होती. यानंतर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत रसिका सुनीलची जागा रिप्लेस करत शनाया हे निगेटिव्ह पात्र साकारलं होत. या पात्रावरही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं.
Discussion about this post