हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध नाटक, सिनेमा, मालिका, रिऍलिटी शोच्या माध्यमातून आपल्या प्रतिभेची छाप पडणारा मराठमोळा अभिनेता संदीप पथक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे मनोरंजन विश्वात कायमच आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या संदीपचा जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान करण्यात आला आहे. ‘राख’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने हा सन्मान मिळवला आहे. मुख्य म्हणजे मध्यंतरी या चित्रपटालादेखील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आता संदीपचा सन्मान हा या चित्रपटासाठी आणखी एक मानाचा तुरा म्हणावा लागेल.
‘राख’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलं आहे आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडील विविध राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ या चित्रपटातील वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेसाठी अभिनेता संदीप पाठक याला गौरविण्यात आले आहे. यानंतर आता थेट ‘जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’ मध्ये अभिनेता संदीप पाठक याने ‘राख’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. हि एक अशा यशोगाथेची मालिका आहे जी थांबणार नाही. मुख्य आणि महत्वाची बाब म्हणजे १५ देशांतील एकूण ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी नामांकित होते. यातून हा पुरस्कार संदीपने मिळवला आहे हि फार कौतुकाची बाब आहे.
अभिनेता संदीप पठक याने पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला कि, ‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी आहे.
अभिनेता संदीप पाठकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचे प्रयोग विविध देशात परदेशात करीत आहे. शिवाय झी मराठी वरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ या शोचे तो सूत्रसंचालनदेखील करत आहे.
Discussion about this post