हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । रणबीर कपूर – आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ने (Brahmastra Collection) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केवळ हिंदी पट्ट्यातच नाही तर आंध्र प्रदेश/तेलंगणासारख्या तेलुगू राज्यांमध्येही या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे. होय, सुरुवातीचे आकडे पाहता, ब्रह्मास्त्राने पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करत रेकॉर्ड केले आहे. ब्रह्मास्त्राने बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘धूम 3’ चित्रपटाचा नऊ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला आहे. तसेच ब्रह्मास्त्राने KGF 2, पुष्पा या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्डसही मोडले आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून जबरदस्त चर्चा आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे चांगले रिव्ह्यू आणि रेटिंग मिळाले नसले तरी यानंतरही सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खिळल्या आहेत. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे पाहता हा चित्रपट धमाकेदार कमाई (Brahmastra Collection) करेल असे मानले जात होते. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्ट्सनुसार ब्रह्मास्त्र चित्रपटाने तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘ब्रह्मास्त्र’ जगभरात एकूण 8 हजार 913 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. यापैकी 5019 स्क्रीन भारतात आहेत. कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज आहे. या चित्रपटाची क्रेझही पाहायला मिळत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने पश्चिम बंगालमधील KGF 2, RRR आणि ‘पुष्पा’ सारख्या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. रणबीर आणि आलियाचा हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये एकूण 560 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. KGF 2 ची स्क्रीन काउंट 552 होती. RRR ला पश्चिम बंगालमध्ये 547 चित्रपटगृहे मिळाली, तर ‘पुष्पा’ 540 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.
Discussion about this post