Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

याच्या वाक्यांसाठी सबटायटलची सोय करा बुवा; ‘ तू तेव्हा तशी ‘ मालिकेतील प्रसिद्ध कलाकारावर आस्तादचा निशाणा

Adarsh Patil by Adarsh Patil
September 13, 2022
in बातम्या, महाराष्ट्र
0
SHARES
1.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । सध्या झी मराठीवर भरपूर अशा मालिका सुरु आहेत ज्यांनी अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. यापैकी एक मालिका म्हणजे ‘तू तेव्हा तशी’. चाळीशीतल्या प्रेमाची एक गोड कथा या मालिकेत दर्शवली आहे. या मालिकेतून अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी मालिका विश्वात पुनरागमन केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हि मालिका फारच खास आहे. अलीकडेच यातील एका ट्विस्टमुळे मालिका आणखीच रंजक झाली आहे. मालिकेतील नकारात्मक भूमिका असणारे एक पात्र समोर आले आहे. हे पात्र साकारणारे प्रसिद्ध अभिनेता अशोक समर्थ यांच्या डायलॉग डिलिव्हरीबाबत बोलताना आस्ताद काळेने मात्र एक विशेष मुद्दा उपस्थित केलाय.

अभिनेता आस्ताद काळे याने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तू तेव्हा तशी मधील नव्याकोऱ्या पात्रावर थेट बोट ठेवलं आहे. आस्ताद म्हणतोय की, ‘झी मराठीवरील एका मालिकेतील त्या एका नटानी साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरती SUBTITLESची सोय करा बुवा. काय बोलतो शष्प कळत नाही’. या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी देखील यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आस्तादने भले कुणाचं नाव घेतलं नाही, पण लोकांनी मात्र तो नेमक कुणाबद्दल बोलतोय हे अचूक ओळखलं. शिवाय झी मराठीच्या मालिकेवर थेट बोट ठेवल्यामुळे देखील आस्ताद चर्चेत आला आहे.

मुख्य म्हणजे पुढे ताजा कलम मध्ये आस्तादने मालिकेबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘ मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती, तेव्हा मधले एक-दोन प्रसंग भोगले’. यावरून समजत की, आस्तादला मालिका आणि मालिकेतील नट किंचितही रुचले नाहीत. पण आता या पोस्टमुळे मात्र ते पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या अभिनयावर शंका उपस्थित होऊ लागली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामिका लग्न करणार होते. मात्र इतक्यात अनामिकाच्या पूर्व पतीने अर्थात आकाश जोशी म्हणजेच अभिनेता अशोक समर्थ यांनी एंट्री केली आणि सगळ बिघडलं. यामुळे प्रेक्षकांचाही बऱ्यापैकी हिरमोड झाला आहे. ज्यामुळे ही मालिका अनेकदा ट्रोल होताना दिसू लागली आहे. अशोक समर्थ यांची सिंघम चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजली होती.

Tags: marathi actorswapnil joshiTV Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group