Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता चंद्रा थिरकणार थेट तुमच्या TV वर; ‘या’ दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 13, 2022
in मराठी चित्रपट, बातम्या
Chandramukhi
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मराठी अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलाच गाजवला. इतकंच काय तर ओटीटीवरही या चित्रपटाने आपली कमाल दाखवली. प्रेक्षक आणि समिक्षक चंद्रामध्ये चांगलेच गुंतले. अगदी गावागावात आणि शहराशहरात चंद्रा आणि तिच्या लावण्या गाजल्या. या चित्रपटासाठी प्रत्येकाने जीव तोडून मेहनत घेतली आणि त्याचच फळ म्हणजे चंद्रमुखी चित्रपटातला मिळालेलं प्रेम आणि भरभरून कौतुक. यानंतर आता हा चित्रपट तुम्ही ओटीटीवरदेखील पहायला मुकला असाल तर हरकत नाही. कारण आता चंद्रा स्वतःच येतेय तुमच्या घरी. होय. हा चित्रपट आपल्याला घरच्या टीव्हीवर पाहता येणार आहे. कारण याचा ग्रँड प्रीमियर लवकरच होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Pravah Picture (@pravahpicture)

सुर तालात रंगलेली चंद्रा आपल्या घुंगराच्या तालावर सगळ्यांना नाचवायला सज्ज झाली आहे. हा चित्रपट आता लवकरच तुम्ही टिव्हीवर पाहू शकणार आहात. सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार ब्लॉक बस्टर बनविणाऱ्या प्रवाह पिक्चरवर हा ग्रँड प्रीमियर होणार आहे. येत्या २५ सप्टेंबर २०२२ रोजी ब्लॉकबस्टर मराठमोळा चित्रपट ‘चंद्रमुखी’ याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाने आधीच संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. तर चित्रपटातील गाण्याची झिंग काही औरच आहे. अजूनही रिल्समध्ये चंद्रा गाणं वाजताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pravah Picture (@pravahpicture)

लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या अत्यंत लोकप्रिय आणि रंजक कादंबरीवर हा संपूर्ण चित्रपट बेतलेला आहे. यामध्ये ध्येय धुरंधर राजकारणी दौलतराव देशमाने आणि सौंदर्यवती लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिका चंद्रा ही अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली आहे. तर दौलतराव या भूमिकेत राजबिंडा अभिनेता आदिनाथ कोठारे दिसत आहे. या दोघांच्याही भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. या चित्रपटातील ‘चंद्रा’ आणि ‘बाई गं’ ही गाणी तुफान गाजली आहेत. मराठीतील लोकप्रिय जोडी अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटातील गाण्यांमधून आपल्याला ऐकायला मिळत आहे.

Tags: Aadinath KothareAmruta KhanvilkarChandramukhiMarathi MovieTV Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group