Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तमन्ना भाटियाच्या ‘बबली बाउन्सर’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या हरियाणवी अंदाजाची हवा

Adarsh Patil by Adarsh Patil
September 13, 2022
in हिंदी चित्रपट, बातम्या, व्हिडिओ
Babli Bouncer
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | दाक्षिणात्य सिने सृष्टीची अत्यंत सुंदर, देखणी आणि लक्षवेधी अभिनेत्री तमन्ना भाटिया बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हिट आहे. सध्या तमन्ना बॉलिवूडच्या प्रेक्षकांसाठी ‘बबली बाउन्सर’ हा नवा चित्रपट घेऊन येते आहे. या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. यात नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि यातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. याचा ट्रेलर फारच रंजक आणि ‘मै नाची बिल्लो मॅड बनके’ हे गाणे जबरदस्त आहे. तमन्नाचा घायाळ करणारा अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू करताना दिसतो आहे.

साधारण २ मिनिटे २२ सेकंदाच्या या गाण्यात तमन्नाचा लक्षवेधी डान्स पाहायला मिळत आहे. या गाण्यात तमन्ना स्वतःसाठी मुलगा शोधतेय. या गाण्याला तनिष्क बागची, असीस कौर आणि रोमी यांनी आपला आवाज दिला आहे. तर तमन्ना या गाण्यामध्ये अतिशय वेगळ्या आणि नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर आली आहे. मधुर भांडारकर हे ‘बबली बाउन्सर’ या चित्रपटाच्या माध्यमातून जवळ जवळ ५ वर्षांनी पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करीत आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी त्यांनी चांगली तयारी केली आहे. या चित्रपटातून तमन्ना देखील एका वेगळ्या भूमिकेतून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया या चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसते आहे. तमन्ना पहिल्यांदाच बॉडी बिल्डरच्या लूकमध्ये रिंगणात दिसणार आहे. विशेष सांगायचे झाले तर, तमन्नाचा बबली बाउन्सर हा चित्रपट वुमन एम्पॉवरमेंटवर आधारित आहे. या ट्रेलरची सुरुवातच आखाड्यापासून होते. जिथे सौरभ शुक्लाच्या एका लांबलचक संवादाला सुरुवात होते. ज्यात त्याने आपली मुलगी तमन्ना म्हणजेच बबलीचे वर्णन सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून करीत आहे. तिला मुलांपेक्षा श्रेष्ठ मानले जात आहे. कुस्तीपटू-बाउन्सर लुकमध्ये तमन्ना हरियाणवी बोलताना दिसतेय.

या चित्रपटाबाबत बोलताना तमन्ना म्हणाली की, ‘हे एक पात्र आहे जे मी यापूर्वी कधीही साकारले नाही. साधारणपणे पुरुष हा व्यवसाय निवडतात. अशी असामान्य व्यक्तिरेखा प्रेक्षकांना देताना खूप रोमांचित आहे’. बबली बाउन्सर येत्या २३ सप्टेंबर २०२२ रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, साहिल वैद्य, अभिषेक बजाज, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक मुख्य भूमिकेत आहेत.

Tags: Babli BouncerHindi MovieTamanna Bhatia
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group