हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अतिशय नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सगळीकडे बॉयकॉट बॉलिवूड आणि बॉयकॉट बॉलिवूड सेलिब्रिटी असे हॅशटॅग ट्रेंड करत होते. याचा परिणाम असा झाला की, बिग बजेट आणि बिग स्टार सेलिब्रिटींच्या चित्रपटांनी चांगलीच धूळ चाखली. यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ तसेच अक्षय कुमारचा रक्षाबंधन सपशेल तोंडावर पडला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांच्या पदरी अपयश आलं. या प्रकारामूळे बऱ्याच थिएटर मालकांच्या पोटावर गदा आली होती. यानंतर एकंदरच सगळ्यांचं लक्ष होत ब्रह्मास्त्र या चित्रपटाकडे. सोशल मीडियावर या चित्रपटासाठी निषेध दर्शविला जात होता पण रीलीजनंतर मात्र या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे. म्हणजेच बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटावर परिणाम झाला नाही हे निश्चित.
आता अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ किती यशस्वी झालाय हे तर बाॅक्स ऑफिसचे गणित समजणारा कुणीही आरामात सांगेल. शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भटच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसाची कमाईने करोडोत केली होती आणि आता अनेक बिग हिट चित्रपटांचे विक्रम तोडले आहे. भारतात ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्याच दिवशी ३६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अयान मुखर्जीने बनवलेल्या अस्त्रांचे हे विश्व जगभरातील प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. जागतिक बाॅक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रने जवळपास ७५ कोटींपेक्षा जास्त ग्राॅस कलेक्शन केले आहे. विकेंडला ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचा आकडा १६० कोटींच्याही वर गेल्याचे पहायला मिळाले. एकंदरच काय तर सध्या ब्रह्मास्त्र एकदम तेजीत चालतो आहे.
ब्रह्मास्त्रने वर्ल्डवाईड बाॅक्स ऑफिसवर आपल्या पहिल्याच विकेंडमध्ये कमाल केली आहे. या चित्रपटाने जवळपास २२५ कोटी रुपयांचे ग्राॅस कलेक्शन केले आहे. सोबतच वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये या विकेण्डला टाॅप चित्रपट म्हणून ‘ब्रह्मास्त्र’चे नाव समोर आले आहे. या लेव्हल पर्यंत येणारा ब्रह्मास्त्र हा बाॅलीवूडचा पहिला चित्रपट आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चिनी चित्रपट ‘गिव्ह मी फाईव्ह’ २१.५० मिलिटन डाॅलरच्या व्यवसायासह आहे. तसेच तिसऱ्या स्थानी दक्षिण कोरियाचा ‘काॅन्फिडेन्शियल असाईनमेंट : इंटरनॅशनल’ हा १९.५० मिलियन डाॅलरचा जागतिक व्यवसाय करून स्थित झालं आहे. दरम्यान सर्व भारतीय चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ‘ ब्रह्मास्त्र ‘ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रह्मास्त्रपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा चित्रपट ‘मास्टर’ आणि एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ वर्ल्डवाईड बाॅक्स ऑफिसवर टाॅप करताना दिसले होते.
Discussion about this post