Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सोनालीच्या ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य उलगडणार.. पण कधी..?; लगेच जाणून घ्या

Adarsh Patil by Adarsh Patil
September 13, 2022
in मराठी चित्रपट, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Victoria Sonali Kulkarni
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. विविध फोटो, दिलखेचक अदा, गोड हास्य आणि अव्वल अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अलीकडेच तिचा झिम्मा आणि पांडू असे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल गाजले. यानंतर आता एका वेगळ्या कथानकासोबत आणि एका वेगळ्या रहस्यासोबत सोनाली आपल्या भेटीला येतेय. तिचा आगामी चित्रपट व्हिक्टोरिया प्रदर्शनास सज्ज झाला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि हटके घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सोनाली सज्ज झाली आहे. ‘ व्हिक्टोरिया ‘ एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये भीती आहे, थरार आहे, अंगावर काटा उभा करणारा एक अत्यंत रंजक अनुभव हा चित्रपट घेऊन येतो आहे. सोनालीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर याचा नवाकोरा थरारक असा टिझर शेअर केला आहे. सोबत चित्रपटाच्या रिलीज डेटचीसुद्धा घोषणा केली आहे. सोनालीने शेअर केलेल्या टीझरमध्ये आपण पाहू शकता की, अतिशय गुंतवणारा असा प्रवाह दिसून येतो. एक दार हळूहळू उघडताना काही न समजणारे अस्पष्ट शब्द कानी येतात. एक तीव्र प्रकाश आपले लक्ष ओढून घेतो आणि इतक्यात दरवाजा उघडतो. समोर व्हिक्टोरिया हे शीर्षक फ्लॅश होते. या टिझरसाठी वापरण्यात आलेले संगीत हे अतिशय थरारक आणि गूढ निर्माण करणारे आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या आधी चेहऱ्यावर अनेक जखमा, भीती आणि घाबरलेल्या अवस्थेतील फर्स्ट लूक सोनाली कुलकर्णीने शेअर केला होता जो चांगलाच चर्चेत राहिला. यानंतर आता हा टिझर चर्चेत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, आशय कुलकर्णी आणि हीरा सोहल हे अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. हा थरारक चित्रपट येत्या १६ डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गुझबंप्स एंटरटेंन्मेंट व्हिक्टोरिया हा चित्रपट हॉरर आणि थ्रिलर ड्रामा असून याचे दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी केले आहे.

Tags: Marathi Moviesonali kulkarniVictoria
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group