Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ललितच्या बर्थडेला ढोमे खाऊन गेला भाव, लवकरच भेटायला येतोय ‘प्रिंस ऑफ पारगाव’

Adarsh Patil by Adarsh Patil
September 14, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Lalit Prabhakar
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मालिका, लघुपट, चित्रपट, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता ललित प्रभाकर फारच लोकप्रिय आहे. ललितने काल म्हणजेच १२ सप्टेंबर २०२२ रोजी स्वतःचा ३५ वा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर सगळं वातावरण ललितमय झालं होत. जो तो सोशल मीडियावर ललितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होता आणि प्रेमाचा वर्षाव करीत होता. यातच अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेदेखील लालितला खास शूभेच्छा देत चाहत्यांना मोठा आनंद दिला आहे. त्याने एक महत्वाची घोषणा करीत आगामी चित्रपटाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये ललित मध्यवर्ती भूमिकेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

पण हेमंत ढोमेचा अंदाज जादू करून गेला. त्यामुळे वाढदिवस जरी ललितचा असला तरी भाव मात्र हेमंत ढोमे खाऊन गेला. आगामी चित्रपट ‘सनी’चे पोस्टर शेअर करीत हेमंतने ललित ला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्ट मध्ये ललितचा फोटो असून त्यावर ‘हॅप्पी बर्थडे सनी भय्या’ असे लिहिलेले दिसत आहे. शिवाय वर ‘प्रिन्स ऑफ पारगाव’ असा बोर्डही आपल्याला दिसतो आहे. या पोस्टर सह हेमंतने भन्नाट कॅप्शन दिले आहे. यात त्याने लिहिले आहे की, ‘कुनी म्हनतं अग्गबाई, कुनी म्हनतं अय्या… बघुन ज्याला होते, मनाची ता थैय्या… ता थैय्या… ललित प्रभाकरचा वाढदिवस, म्हणजे मजा आ गय्या… मजा आ गय्या..!! आमचे लाडके ‘सनीभैय्या’ यांना त्या ठिकानी खूप खूप शुभेच्छा! भेटूया सनी भैय्याला १९ नोव्हेंबर पासुन तुमच्या जवळच्या थेटरात!’

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

याआधी सनी या चित्रपटाचे लक्षवेधी पोस्टर शेअर करण्यात आले होते. तेव्हा ललित प्रभाकरचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. या चित्रपटातील त्याचा कुल लूक तरुणींना आणखीच वेड लावतो आहे. तर दुसरीकडे मराठी सिनेसृष्टीत हेमंत ढोमे चांगलाच गाजतोय. कारण कोरोनानंतर हेमंतने केलेला झिम्मा हा चित्रपट तुफान चालला. या चित्रपटाने कोरोनानंतर मराठी चित्रपट सृष्टीला चांगली चालना दिली. शिवाय हा चित्रपट चांगला हिट गेल्यामुळे आता सनी या चित्रपटाकडून देखील फार अपेक्षा आहेत.

Tags: Lalit Prabhakarmarathi actorMarathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group