हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या आघाडीवर आहे. एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृतीतून तिने आपले स्थान भक्कम निर्माण केले आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ‘रानबाजार’सारख्या वेबसीरिजमधून तिने एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर पाडली. शिवाय ती लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्राचे सूत्रसंचालन अतिशय सुंदररित्या करते. पण अलीकडे हास्यजत्रा सोडून ती थेट लंडनला जाऊन पोहोचली आहे अशा चर्चांनी जोर धरला होता. मग प्राजक्ता लंडनला का गेली..? ती आता परत येणार नाही का..? हास्यजत्रेचं सूत्रसंचालन करणार नाही का..? असे प्रश्न चाहत्यांना पडले. यानंतर या प्रश्नांची उत्तरं देणारी पोस्ट स्वतः प्राजक्तानेच केली आहे.
त्याच काय झालं.. अलीकडेच प्राजक्ताने सोशल मीडियावर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबतचा विमानतळावरील एक फोटो स्टोरीमध्ये शेअर केला होता. यासोबत तिने आपण परदेशात गेल्याचं सांगितलं. यामुळे हास्यजत्रेचा नवा सीजन सुरु असताना सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता अचानक कशी गेली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याचे उत्तर देताना आता प्राजक्ताने स्वतःच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पण या चित्रपटाचा मुहूर्त लंडनमध्ये संपन्न झाला आहे आणि याचे फोटो प्राजक्ताने या पोस्टसोबत शेअर केले आहेत. या चित्रपटात प्राजक्ता माळीसह, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि नितीन वैद्य सिनेमाची निर्मिती करत आहेत.
प्राजक्ताने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंसह तिने खास कॅप्शनही शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती हास्यजत्रा सोडून लंडनला का आली..? याचं उत्तर तिने दिलंय. प्राजक्ताने लिहिलं आहे कि, ‘हो शुभारंभ, हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये सिनेमाच्या शुटींगला सुरुवात. जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री लंडनमध्ये शुट करुन गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता आणि अखेर मी इथे आली. याच सगळं श्रेय हृषीकेश सर आणि नितीन वैद्य सर यांना जात #कृतज्ञ. शिवाय या मुलांसोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे @vaibhav.tatwawaadi @sankarshankarhade आणि @alokrajwade. तसेच, “महाराष्ट्राची हास्यजत्रा”… #myshow पाहायला विसरू नका.’
Discussion about this post