Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टॉलिवूड- बॉलिवूडचं थार मार ट्युनिंग; ‘गॉडफादर’च्या पहिल्या गाण्याचा प्रोमो चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 14, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
GodFather
0
SHARES
149
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून बॉलिवूडचे जरा वाईट दिवस सुरु आहेत. तर टॉलिवूडने मात्र सुगीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. बॉलीवूड कलाकार टॉलीवूडकडे वळले आहेत आणि टॉलिवूडच्या कलाकारांना बॉलिवूडकडे ओढू लागले आहेत. सध्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गॉडफादर या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. कारण या चित्रपटात दोन इंडस्ट्रीतील दोन सुपरस्टार एकत्र एकच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हे कलाकार म्हणजे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आणि टॉलीवूड्चे सुपरस्टार चिरंजीवी. नुकताच यांच्या गॉडफादर चित्रपटातील बाहुल्या गाण्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Chiranjeevi Konidela (@chiranjeevikonidela)

याआधी आरआरआर या चित्रपटाच्या प्रोमोशन इव्हेन्टमध्ये सलमान खानने आपले आणि टॉलीवूडचे फार जुने संबंध आहेत असे म्हटले होते. त्यातील कित्येक कलाकार आपले चांगले मित्र असल्याचेही त्याने सांगितले होते. यानंतर आता थेट टॉलिवूडच्या सुपरस्टारसोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसतो आहे. सध्या गॉडफादर हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे प्रमोशन एकदम जोरात सुरु झालं आहे. मुख्य म्हणजे सलमान पहिल्यांदाच चिरंजीवीसोबत दिसणार आहे. टॉलीवूडच्या कलाकारांसोबत बॉलीवूडच्या कलाकारांना काम करताना पाहण्याची एक वेगळीच संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दरम्यान गॉडफादरच्या गाण्याचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.

https://www.youtube.com/watch?v=DxWjF5YwPpI

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी याचा ट्रेलरदेखील आला होता. या चित्रपटामध्ये सलमान दिसणार असल्यामूळे प्रेक्षकांमध्ये वेगळीच उत्सुकता आहे. ‘थार मार थक्कर मार’ असे या गाण्याचे नाव आहे. तूर्तास फक्त प्रोमो रिलीज झालाय तर एव्हढी उत्सुकता ताणली आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर काय होईल याचा नेम नाही. मुख्य म्हणजे हे गाणे उद्या प्रदर्शित होणार आहे. अनंत श्रीराम यांनी गाण्याचे बोल लिहिले आहे तर थमन एस यांनी संगीत दिले आहे. गॉडफादर हा मूळ तमिळ मुव्ही ‘ल्युसिफर’चा तेलूगु रिमेक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: Chiranjeevigod fatherInstagram PostNew Upcoming MovieSalman KhanViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group