हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे चाहत्यांच्या संपर्कात ती नेहमीच राहते. अनेकदा ती सोशल मीडियावर विविध लूक, विविध फोटोशूट, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. गेल्या काही काळापासून प्रार्थनाने साडीचा नवा ट्रेंड सुरु केलाय का काय..? असे वाटत आहे. साडीतही ग्लॅमरस दिसता येतं हे या अभिनेत्रीने सिद्ध केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तीच नवंकोरं साडीतील फोटोशूट चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.
मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. सोबत काही व्हिडीओ देखील तिने शेअर केले आहेत. यामध्ये प्रार्थने टिश्यू सिल्क साडी परिधान केली आहे. जिचा रंग पिवळा असून त्यावर गुलाबी रंगाची फ्लोरल डिझाईन आहे. शिवाय तिने यावर साजेसा मॅचिंग गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. मोकळे केस आणि मोहक हास्य यामुळे तिचा लूक आकर्षक आणि तितकाच लक्षवेधी ठरतो आहे. प्रार्थनाने परिधान केलेली साडी हि कारागिरी एथनिक यांनी डिझाईन केलेली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती झी मराठीवर सुरु असलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये तिच्यासोबत मराठी अभिनेता श्रेयस तळपदे स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. या मालिकेचा टीआरपी रेट उत्तम असून सध्याच्या आघाडीच्या मालिकांपैकी एक अशी हि मालिका आहे. प्रार्थना आणि श्रेयस यांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे. अनेकदा ती सेटवरील धमाल मस्तीचे विविध फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
Discussion about this post