हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी कच्चा बदाम’ या गाण्यावर रिल करणारी अंजली अरोरा एका MMS व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. अंजलीचा MMS व्हिडीओ लीक झाल्याच्या चर्चांनी संपूर्ण सोशल मीडिया हादरलं होत. यांनतर आता आणखी एका अभिनेत्रीचा MMS व्हिडीओ व्हायरल होत असल्याची चर्चा आहे. हि अभिनेत्री म्हणजे बिग बॉस ओटीटी फेम भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग. होय. अंजलीनंतर आता अक्षराचा MMS व्हिडीओ लीक झाल्याचं समोर आलंय.
अक्षरा ही केवळ यूपी बिहारपुरता मर्यादित अभिनेत्री नसून विविध भाषिक इंडस्ट्रीसाठी ओळखीचा चेहरा आहे. अभिनयासोबतच तिच्या गायनाचेही असंख्य चाहते आहेत. तिची अनेक गाणी युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात. मात्र आता MMS व्हिडीओमूळे अक्षराचं नाव जेव्हढं चर्चेत आलंय त्याची तुलना अन्य कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. अद्याप हा व्हिडीओ मूळ आहे कि मॉर्फ केलेला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र अक्षराचे चाहते हा कथित व्हिडिओ असल्याचा दावा करत आहेत. तर काही लोक या व्हिडिओत अक्षराचं आहे असे म्हणत आहेत. मात्र अजूनतरी स्वतः अक्षरा सिंगने याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षराचे चाहते आणि ट्रोलर्स यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. एकीकडे ट्रोलर्स अक्षरावर बिनचूक निशाणा साधत तिला ट्रोल करत आहेत. तर दुसरीकडे तिचे चाहते हा व्हिडिओ फेक आहे म्हणत ट्रोलर्सला धारेवर धरत आहेत. शिवाय अक्षराचे चाहते तिलामाध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्टीकरण देण्याची विनंती करत आहेत. अक्षराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय ती कलर्स हिंदीच्या बिग बॉस ओटीटी शोमध्येदेखील दिसली होती. तसेच काही दिवसांपूर्वी तिचा आमिर खानसोबतचा डान्स व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.
Discussion about this post