हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग कानी पडला आणि निळू फुलेंची आठवण आली नाही असे होणे शक्यच नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले व्यक्तिमत्व दिवंगत अभिनेते निळू फुले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आघाडीचा दिग्दर्शक प्रसाद ओक त्यांच्यावर बायोपिक तयार करीत आहे. या बातमीमुळे मराठी प्रेक्षकांमध्ये आनंद पसरला आहे. निळकंठ कृष्णाजी फुले अर्थात आपले लाडके निळू फुले यांची कारकीर्द मोजताही येणार नाही एव्हढी मोठी आहे. मराठी लोकनाट्य कथा ‘अकलेच्या कांद्याची’ या नाटकाचे दोन हजारांहून अधिक शो करून ते प्रकाश झोतात आले होते. यानंतर १९६८ साली ‘एक गाव बारा भानगडी’पासून मराठी आणि ‘कुली’ चित्रपटापासून हिंदी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली. अशा कलाकारावर जीवनपट येणे हि बाब फार मोठी आहे.
नीळू फुले त्यांच्या आवाजासह आणि उत्कृष्ट संवादफेकीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी वठवलेला खलनायक अंगावर शहारे आणणारा आहे. आजही चित्रपटातील त्यांची भूमिका पाहताना वास्तविक जीवनातील स्त्रिया ते खरच असेच होते या विचाराने त्यांचा तिरस्कार करतात. पण प्रेक्षक वर्ग हा तिरस्कारही कौतुकाने करतो. कारण निळू फुले यांच्या अभिनयात पात्र सत्यात उतरविण्याची ताकद होती. हा तिरस्कार याचीच पोचपावती आहे. निळे फुले यांच्या जीवनपटात त्यांची भूमिका कोण साकारणार..? याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण ही भूमिका प्रसादच करेल असा अनेकांनी अंदाज वर्तविला आहे.
आगामी प्रोजेक्टविषयी बोलताना प्रसाद म्हणाला कि, ‘मी निळू फुले यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात उद्बोधक अनुभव होता. आणि आता त्यांच्यावर चित्रपट बनवता येणे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. तो माझ्यासाठी आहे. तो एका गुरूसारखा आहे आणि मला आशा आहे की आम्ही त्याची कथा योग्य पद्धतीने पडद्यावर मांडू शकू.’
तर निळू फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले म्हणाल्या कि, ‘प्रसाद ओक यांनी माझ्या वडिलांसोबत खूप वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट बनवण्यास ते खूप उत्सुक होते. मला त्यांच्या कथाकथन आणि सर्जनशीलतेच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर विश्वास आहे.’
Discussion about this post