हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याचा ‘गोदावरी’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे मनाला भावणारे कथानक आणि पात्र साकारणाऱ्या कलाकारांचा अभिनय. या चित्रपटाने बघता बघता अनेक नामांकित पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. फक्त भारतातच नाही तर परदेशातही गोदावरी गाजला. मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हा चित्रपट याच वर्षात येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण याआधी पुरस्कार थांबले असं नाही बरं का. तर गोदावरी चित्रपटाने सध्या ‘प्रवाह पिक्चर अवॉर्ड्स’मध्ये मानाचे ७ पुरस्कार आपल्या नावे करीत आणखी एक विक्रम केला आहे.
प्रवाह पिक्चर वाहिनीचा ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार’ नुकताच पार पडला असून यावेळी गोदावरी चित्रपटाने चांगलीच बाजी मारली. गोदावरी’ने एक दोन नव्हे तर तब्बल ७ पुरस्कारांवर विजयी शिक्का मारला आहे. या संदर्भात अभिनेता जितेंद्र जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे कि, ”गोदावरी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु तत्पूर्वी प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात ७ पुरस्कार लाभले.
सर्वोत्कृष्ट ध्वनी – बेलोन फोंसेका,
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – ए व्ही प्रफुल्लचंद्र,
सर्वोत्कृष्ट पार्श्र्वगायक – राहुल देशपांडे,
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – प्रियदर्शन जाधव,
सर्वोत्कृष्ट कथा – निखिल महाजन, प्राजक्त देशमुख,
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – निखिल महाजन,
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जितेंद्र जोशी असे हे पुरस्कार आहेत.’ इतकेच नव्हे तर अभिनेता जितेंद्र जोशीने सर्वांचे आभारही या पोस्टमध्ये मानले आहे.
जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित ‘गोदावरी’ या चित्रपटात जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार अन्य महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आत्तापर्यंत ‘गोदावरी’ने अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्कर जिंकले आहेत.
यात न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म,
‘कान्समध्येही सर्वोत्तम पुरस्कार आणि IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक
तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी विशेष ज्युरी पुरस्कार
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार
तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार.. असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Discussion about this post