हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत चर्चेत असणारे नाव म्हणजे किरण माने. आपल्या अभिनयापेक्षा विविध मुद्द्यांना हात घालून परखड बोलणे आणि टोकदार लेखणीतून व्यक्त होणे यात त्यांचा हातखंडा आहे असं म्हणावं लागेल. त्यांचा स्वतःचा असा अभिनयाचा आणि लेखणीचा वेगवेगळा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या मराठीबाणा या मराठी वाहिनीवर किरण माने ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहेत. या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग त्यांना भरभरून प्रेम देत आहे. याचा प्रत्यय येताच मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी देखील मानेंवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसत आहे.
किरण माने यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, “अरे किरण, माझी आई आत्ता तुला टी.व्ही.वर बघून म्हणाली ‘हे बघ, ह्यो मानूस तुकाराममहाराज माने हाय… लै भारी बोलतो.’…” आमचे जिगरी दोस्त आनि लै फेमस लेखक बासुदा उर्फ बालाजी सुतार यांचा फोन आला… ते पुढं म्हन्ले, “तू कुठल्यातरी किर्तनाच्या कार्यक्रमाचं ॲंकरींग करतोस ना? तो ती रोज बघते.” बासुदांनी एवढं बोलुन माऊलीकडं फोन दिला. भरभरून कौतुक केलं तिनं… जनू फोनवरनंच माझा आलाबला घिवून कानशीलावर कडाकडा बोटं मोडली. माझ्यासाठी मराठीबाणा चॅनलवर रोज न चुकता ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ बघते ती. साक्षात इठूरायाच्या रखमाईनंच असं कौतुक केल्यावर आपल्या कामाचं चिज झाल्यागत वाटतं राव. भरून पावनं म्हन्जे काय ते कळतं. संघर्षाचा सगळा थकवा निघून जातो.
भाग गेला शीन गेला । अवघा झाला आनंद ।।
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ।।
– किरण माने.
यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आजच्या युगात आजच्या पिढीत खरोखर तुमच्या इतका तुकाराम कुणातच घुसलेला नसावा,,,,तुम्हाला त्या भक्तीचा मोबदला पांडुरंगाला न चुकता द्यावा लागत राहील,,,,,’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘याहून स्वर्गसुख ते काय.. खूप अनमोल माणसं मिळवली तुम्ही आयुष्यात.. खूप भारी वाटत जेव्हा आपल्या आवडत्या अभिनेताबद्दल कोणी एव्हढं कौतुक करत.. लव यु दादा..’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘आपलं तुकोबारायांबाबत ज्ञान खरोखरच प्रचंड आहे..तुमचं अँकरिंग करणं इतरांसारखं सहज आणि सोपं नाहिए..सलाम दादा…. लवयु’.
Discussion about this post