Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो’; कुशल बद्रिकेची मनाला भिडणारी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kushal Badrike
0
SHARES
163
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीत आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. विविध चित्रपट, वेब सिरीज आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतकेच नव्हे तर कुशल सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. यामुळे कुशल अनेकदा विविध पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. यावेळीही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. जी अगदी काळजाला भिडेल अशी आहे. ‘बालपणाचा वास’ असा या पोस्टचा आशय आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

 

अभिनेता कुशल बद्रिकेने हि पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘माझ्या जुन्या घराला लागून एक छोटं मैदान आहे, तसं माझं बालपण घरापेक्षा जास्त वेळ या मैदानातच गेलं खरंतर. अगदी भातुकली पासुन कबड्डी, खोखो, क्रिकेट, आबादुबी, लपंडाव , पतंग ते होळी, दिवाळी, दहीहंडी… पर्यंत सगळ सगळ तिथे अनुभवल. आज माझ्या मुलाला निबंध म्हणून 10 मार्कासाठी जे जे विषय आहेत ते ते सगळं “माझ” या मोकळ्या मैदानात शिकून आणि जगून झालंय. बालपणी इथल्या “गवताचा वास” आमच्या अंगाखांद्याला चिकटून राहायचा कितीही घासून आंघोळ केली तरी जाता जायचा नाही हा “वास” आता इतक्या वर्षांनी पाहीलं तर “इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो.’

कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रातिक्रिया देत आपल्या बालपणाची आठवण आल्याचे म्हटले आहे. एकाने कमेंट करताना लिहिले आहे कि, ‘बालपण देगा देवा’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘काय करावं ह्या माणसाच्या कॅप्शन चं? घायाळ !!!’. तर आणखी एकाने कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘काय कल्पना आहे.. गावातल्या बालपणाचा वास येतोय.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘गावाकडची मजाच वेगळी असते कुशल दादा.’ असेच अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘तू कॅप्शन इतकं भारी टाकलं आहेस कि त्यामुळे फोटो अर्थपूर्ण झाला आहे. खूपच मस्त आणि एकदम खरं खरं.’

Tags: Instagram Postkushal badrikemarathi actorViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group