Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मनोरंजन महाग होतंय का..?’; 75 रुपयांच्या शोला गर्दी करणाऱ्यांसाठी हेमंत ढोमेचं ट्विट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वत्र ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवसानिमित्त सिनेमा थिएटर्समध्ये कोणताही चित्रपट केवळ ७५/- रुपयांत पाहण्याची सुवर्ण संधी प्रेक्षकांना लाभली. हे गिफ्ट प्रेक्षकांना इतकं आवडलं कि, थिएटर- मल्टिप्लेक्स प्रेक्षकांनी तुडुंब भरून गेले होते. सगळीकडे नुसते आणि नुसते हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसले. अशातच मराठी अभिनेता हेमंत ढोमे याने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट केले. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!
म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात?
प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? #NationalCinemaDay pic.twitter.com/tzpaQMtPgB

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 23, 2022

अभिनेता हेमंत ढोमे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हॅण्डलवरून हि पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात..? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का..?’. हेमंतच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यांपैकी काहींना हेमंतने रिप्लायसुद्धा केला आहे.

किंवा सरसकट तिकीट दर कमी होऊ शकतील?

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 23, 2022

यातील एका नेटकऱ्याने उत्तर देत म्हटलंय कि, ‘खरंतर हो. तीन माणसांचे एका सिनेमासाठी हजार रूपये खर्च होतात मल्टिप्लेक्समधे. सिनेमा मनापासून आवडत असूनही तिकीट दरांमुळे न परवडणाऱ्यांसाठी हे नक्कीच चांगलं नाही. तिकीट दर नियंत्रित असायला हवेत ही वस्तुस्थिती आहे. चार स्क्रीनच्या मल्टिप्लेक्समधे दोन स्क्रीन्स कमी दराचे असू शकतील.’ यावर हेमंतने प्रश्नार्थक तोडगा काढत म्हटले कि, ‘किंवा सरसकट तिकीट दर कमी होऊ शकतील?’.

त्या त्या चित्रपटगृहा नुसार वर्गीकरण करता येऊ शकेल आणि अगदी ७५ रू. नको पण सुवर्णमध्य नक्कीच हवा… खिशाला परवडेल, आपलं वाटेल तेच मनोरंजन!
यावर कायमस्वरूपी तोडगा हवा…
महागाई भयंकर आहे यात प्रत्येकाने आपापला व्यवसाय टिकवणं हे अजुनच कठीण!

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 23, 2022

याशिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तिकीट महाग याची सुरुवात ‘हम आपके…'(९४)ने झाली. काही वर्षानी मल्टीप्लेक्स युगात ते रुजले. आणि ‘स्टाॅलच्या पब्लिक’चा सिनेमा नवश्रीमंत, उच्चभ्रू वर्गाचा होताना समाजातही बदल होतच होता. कनिष्ठ मध्यमवर्गीयला तिकीटे परवणारी सिंगल स्क्रीन कालबाह्य झाली. यात सुवर्णमध्य ७५ रु.चे तिकीट’. यावर प्रतिक्रिया देताना हेमंतने लिहिले कि, ‘त्या त्या चित्रपटगृहानुसार वर्गीकरण करता येऊ शकेल आणि अगदी ७५रू. नको पण सुवर्णमध्य नक्कीच हवा… खिशाला परवडेल, आपलं वाटेल तेच मनोरंजन! यावर कायमस्वरूपी तोडगा हवा… महागाई भयंकर आहे यात प्रत्येकाने आपापला व्यवसाय टिकवणं हे अजुनच कठीण!’

Tags: Hemant Dhomemarathi actorNational Cinema Dayviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group