Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Chup
0
SHARES
5.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सनी देओल गेल्या बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर होता. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी त्यानं कमबॅक केलंय आणि तेही जोरदार. अभिनेता सनी देओलचा ‘चूप- द रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. या चित्रपटात अभिनेता सनी देओल सोबतच दुलकर सलमान हा देखील अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. चाहत्यांचं प्रेम पाहता अजूनही सनी देओल हे पर्व इंडस्ट्रीवर राज्य करतंय म्हणायला हरकत नाही.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

हा चित्रपट शुक्रवारी रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट विनामूल्य बघण्याची संधी दिली होती. ‘चुप’ या चित्रपटाचा फ्रीव्ह्यू प्रेक्षकांना विनामूल्य बघता आला. दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रेक्षकांना चुप हा चित्रपट विनामूल्य पाहण्याची एक सुवर्णसंधी निर्मात्यांनी उपलब्ध करून दिली आणि बघता बघता ‘बुक माय शो’ वर सगळे बुकिंग हाऊसफुल्ल झाले. विशेष सांगायचे म्हणजे, अगदी १० मिनिटांमध्ये या चित्रपटाचे सगळे शो बुक झाले होते. प्रेक्षकांनी बुकिंगला दिलेला प्रतिसाद पाहून चित्रपट निर्मातेदेखील खुश झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

मुंबई, पुणे, जयपूर, हैद्राबाद, दिल्ली, लखनऊ, बंगलोर अशा मोठंमोठ्या हायटेक सिटींमध्ये या चित्रपटाचा फ्रीव्ह्यू प्रेक्षकांनी पाहिला. ‘चुप’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा एका तडफदार आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. तर अनेक वर्षांनंतर या चित्रपटातून पूजा भट्टने देखील कमबॅक केलंय. मुख्य म्हणजे या चित्रपटासाठी बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी संगीत सृष्टीत पदार्पण करीत संगीतकार म्हणून जबाबदारी निभावली आहे.

Tags: bollywood actorChup MovieInstagram Postsunny deolViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group