हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अन सुपरस्टार गोविंदा यांची नुकतीच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली. यावेळी रश्मीकाने गोविंदासोबत सामी सामी गाण्यावर जोरदार डान्स केला. गोविंदा आणि रश्मिकाची जुगलबंदी पाहून चाहत्यांच्या उत्साहाला पारावार उरला नाही.
डीआयडी सुपर मॉम्सच्या ग्रँड फिनाले निमित्त सुपरस्टार गोविंदा आला होता. यावेळी अभिनेत्री रश्मीका मंदानाहि उपस्थित होती. पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली रश्मिका मंदान्नाचे सामी सामी हे गाणे सुपरहिट झाले होते. ग्रँड फिनालेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी मंदावला सामी सामी गाण्यावर डान्स करण्याची मागणी केली. यावेळी गोविंदा आणि रश्मिकाने सामी सामी गाण्यावर जोरदार डान्स केला.
Nahi hata paayenge aap bhi apni ankhiyaan, jab manch par saami, saami karenge #RashmikaMandanna aur #Govinda! 🔥👯Dekhiye #DIDSuperMoms, kal, raat 9 baje, sirf #ZeeTV par aur kahin bhi, kabhi bhi #ZEE5 App par.#HarMomSuperMom #SapnonKaGrandFinale #Promo pic.twitter.com/CgsJKuXwdE
— ZeeTV (@ZeeTV) September 24, 2022
चाहते पुष्पा भाग २ ची वाट पाहत आहेत
पुष्पा नंतर आता चाहते अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता आणि दुसऱ्या भागातही रश्मिका मंदान्ना आपल्या स्टाईलची जादू चालवणार असल्याचे मानले जात आहे. साऊथची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आता हिंदी चित्रपटांमध्येही पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.
बिग बींची अशी पहिली भेट होती
रश्मिका मंदान्ना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Discussion about this post