हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील परखड आणि थेट व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या अभिनयाइतकीच स्वभावाची प्रसिद्ध आहे. यात ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे स्पष्टपणे व्यक्त होण्यासाठी ती अनेकदा लेखणीचा वापर करताना दिसते. तिचा हा स्वभाव तिच्या व्यक्तिमत्त्वाला अत्यंत साजेसा आहे. अर्थात यामुळे अनेकदा ती ट्रोल झाली आहे. पण मागे हटली नाही. नुकतीच हेमांगीने आणखी एक पोस्ट केली आहे. जी चांगलीच चर्चेत आहे. कारण नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात अन् हेमांगीच्या पोस्टची ‘हीच माझी दुर्गा…’ अशी सुरुवात दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे असे वाटत आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाली आहे हेमांगी..?
हेमांगी कवीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचा उल्लेख केला आहे. तिच्या पोस्टचा आशय पाहता रवी जाधव दिग्दर्शित नव्या वेब सिरीज संदर्भात ती काही बोलू पाहतेय हे जाणवतं. त्याचं काय आहे, रवी जाधव करीत असलेल्या वेबसिरीजमध्ये हेमांगी काम करतेय आणि त्यात तिच्यासोबत जी अभिनेत्री आहे तिच्यासोबत काम करण्याचं तीच स्वप्न होत. जे रवी जाधव यांनी पूर्ण केले आहे. यानिमित्त तिने हि पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिले आहे कि, ‘काल मला माझी दुर्गा भेटली. दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही. मी आणि रवी जाधव सर एकाच कॉलेजचे, जे जेचे. रवी सर माझे Senior! 2008 ला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी धुडगूससाठी रवी सरांनी campaining केलं होतं ते थेट आता एकत्र काम करायचा योग जुळून आला आणि काय कमाल योग जुळून आलाय. रवी सरांच्या आगामी webseries मध्ये मी जिच्या सोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्यामुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते!
पण ज्याची कल्पना ही केलेली नसते साधं स्वप्न ही पाहिलेलं नसतं जेव्हा ते आपल्या समोर उभं राहतं तेव्हा आपलं काय होत असेल ओ? ती साक्षात माझ्या समोर उभी होती! कसं? तिला डोळ्यात सामावून घेऊ की खूप बोलू की गप्प बसून नुसतं न्याहाळत राहू? Scene करताना ती माझ्या डोळ्यात बघत होती, हातात हात घेत होती, मला जवळ घेत होती. Scene संपल्यावर मला मिठी मारत होती! आई शप्पथ! प्रश्न पडत होते, Is this real? सांगणार सगळं सांगणार तोपर्यंत…Ravi Sir i owe this to you. Big time. Industry तले लोक तुम्हांला प्रेमानं, लाडा नं ‘देवा’ म्हणतात ना… मी म्हणेन, ‘देवा मी न मागता माझ्या पदरात हे दान टाकलस की रे!’ काल दिवसाची सुरवात देवीच्या दर्शनाने झाली तर सांगता इंद्रधनू ने! यालाच देव पावल्याचे संकेत म्हणायचे।
घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या तुम्हांला सर्वांना शुभेच्छा! हेमांगीच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. पण आता हि दुर्गा म्हणजे नेमकं कोण..? याच उत्तर मिळण्याची वाट पाहावी लागणार हे नक्की आहे.
Discussion about this post