हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या संस्कृतीनुसार लग्नाआधी मुलाचे आणि मुलीचे पत्रिकेतील ‘३६ गुण’ पाहिले जातात. ते जुळत असतील तर लग्न एकदम पक्के पण कुठे मागे पुढे झालं तर मग अवघड आहे. हे गूण त्या दोघांचा संसार कसा असेल ते सांगतात म्हणे.. पण जर मुळातच त्यांचा ‘३६’ चा आकडा असेल तर…? मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील तडफदार अभिनेता संतोष जुवेकर अखेर या आकड्यात अडकलाच. म्हणजेच त्याचे आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांचे ‘३६ गूण’ जुळलेत बरं का.. थांबा.. थांबा.. एव्हढा विचार करू नका. हे ३६ गूण खऱ्या खुऱ्या आयुष्यात जुळले नाहीत तर रिल लाईफमध्ये जुळले आहेत.
अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटात हि जोडी मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. तरुण पिढीचा विचार केला तर भारतीय लग्नसंस्थेबाबत त्यांचे मत काय आहे हे सांगणारा हा चित्रपट आहे. अत्यंत मनोरंजनात्मक आणि कौटुंबिक असा हा चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तर लंडनमध्येही काही ठिकाणी याचे शूट केल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरदारं पाहून, चहा पोहे खाऊन, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने विवाह झालेले सुधीर आणि क्रिया हनिमूनसाठी लंडनला जातात. पण त्यानंतर मात्र त्यांना एकमेकांचे गुण-अवगुण दिसतात आणि वेगळेपणाची जाणीव होते. मग काय आणि किती फटाके फुटतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
या चित्रपटात संतोष आणि पूर्वा यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार दिसणार आहेत. ‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फ़िल्म्स’ निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली आहे. तर कथा पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे.
Discussion about this post