हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक, बालगंधर्व अशा क्रांती घडविणाऱ्या भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. विविध नाटकं, मालिका आणि चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून त्याने नेहमीच आपल्या अभिनयाची एक उत्तम छाप पाडली आहे. यानंतर आता सुबोध भावे वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. ‘कालसुत्र’ या आगामी वेबसिरीजमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून हि सिरीज कधीपासून आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार याबाबत प्रेक्षकल उत्सुक आहेत.
अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने शूटिंग सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ ‘कालसूत्र’ प्रथम दालन – मृत्यूदाता.. मे पासून सुरू झालेला शूटिंग चा प्रवास काल अखेरीस संपला. तब्बल ७० दिवसाचं शूटिंग. जियो स्टुडिओ, निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील कलाकार यांच्या अथक प्रयत्नाने मराठी भाषेतील पहिली मोठी रहस्यप्रधान वेब मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कालसूत्रच्या टीझरला तुम्ही अत्यंत भरभरून प्रतिसाद दिलात. आता ही संपूर्ण वेब मालिका तुमच्या समोर सादर करण्याची आम्हा सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. कुठल्या प्लॅटफॉर्म वर येणार आहे ते ही लवकरच जाहीर होईल. पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण संघाचे आणि तुम्हा सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार!’
माहितीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये ‘कालसूत्र – प्रथम द्वार मृत्यूदाता’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजच्या टिझरने सोशल मीडियावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. निखिल साने, मंजिरी भावे आणि ज्योती देशपांडे (जिओ स्टुडिओ) निर्मिती हि वेबसिरीज एक चित्तथरारक माईंड गेम आहे. यामध्ये एक विकृत सिरियल किलर आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी म्हणजेच सुबोध भावे यांच्यात संघर्ष होताना दिसेल. जिओ स्टुडिओज मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी ॲक्शन थ्रिलर वेब शो प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज झाले आहेत.
Discussion about this post