हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Navratri Special Songs) राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सव किती जल्लोषात साजरी केली जात आहे. या दिवसांमध्ये आदिमायेच्या नऊ स्वरूपाची पूजा, अर्चना आणि आराधना केली जाते. हे अत्यंत पावन आणि मंगलमयी दिवस असतात. या दिवसांमध्ये सर्वत्र वातावरण अत्यंत आनंदी, उत्साही आणि प्रफुल्लित असते. नवरात्रीचे विशेष आकर्षण म्हणजे गरबा आणि दांडिया रास. यानिमित्त नवरात्रीच्या नऊ दिवस ठीकठिकाणी मंडपात वा मैदानात गरबा खेळला जातो. अशावेळी एकतर ऑर्केस्ट्रा टीम मनोरंजन करते नाहीतर डेकवर वाजणारी गरब्याची गाणी. यांपैकी कित्येक गाणी हि सिनेइंडस्ट्रीतील गाजलेल्या चित्रपटातील आहेत. चला तर जाणून घेऊया त्या गाण्यांची यादी ज्यांनी गेली अनेक वर्ष गरब्याची मजा राखली आहे.
१. चित्रपट – सुहाग
गाण्याचे नाव – ओ शेरोवाली (Navratri Special Songs)
सुहाग या १९७९ साली आलेल्या चित्रपटातील ‘ओ शेरोंवाली’ हे गाणं आजही वाजलं तर गरब्यात नुसती धूम उठते. हे गाणे प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायले आहे. तर अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित झालेले आहे.
२) चित्रपट – क्रांतिवीर
गाण्याचे नाव – ‘अंबे जगदंबे’
क्रांतिवीर या १९९४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अंबे जगदंबे हे गाणे अतिशय चैतन्यदायी आहे. या गाण्यावर कित्येक तास रास रंगतो. प्रफुल्ल दवे, सपना अवस्थी आणि सुदेश भोसले यांनी हे गाणे गायले आहे. नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.
३) चित्रपट – हम दिल दे चुके सनम
गाण्याचे नाव – ढोली तारो ढोल बाजे
हे गाणे तर नवरात्रीत लावले नाही असं होणारच नाही. जय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील केमिस्ट्री आजही आठवली जाते.लोकप्रिय गरबा गाण्यांपैकी ढोली तारो ढोल बाजे हे गाणे आहे. (Navratri Special Songs)
४) चित्रपट – खूबसूरत
गाण्याचे नाव – घुंघट में चाँद होगा
खूबसूरत या १९९९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘घुंघट में चाँद होगा’ या गाण्याच्या तालावर तर सगळ्या वयोगटातील रसिक थिरकतात. हे गाणे कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायले आहे. या गाण्याचे चित्रीकरण अभिनेता संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांच्यावर झाले आहे.
५) चित्रपट – ‘गोलियों की रासलीला रामलीला’
गाण्याचे नाव – नगाडे संग ढोल बाजे
‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘नगाडे संग ढोल बाजे’ उया गाण्यातील दीपिकाचा डान्स तर चांगलाच हिट आहे. हे गाणे दि[एक पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यावर चित्रपट करण्यात आले आहे. तर गायिका श्रेया घोषाल आणि ओस्मान मीर यांनी हे गाणे गायले आहे.
६) चित्रपट – काई पो चे
गाण्याचे नाव – शुभारंभ
शुभारंभ या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील शुभारंभ हे गाणे राजकुमार राव आणि अमृता पुरी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. चेतन भगतच्या 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ या कादंबरीवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला होता. या गाण्यातला जल्लोष अंगात संचारला कि मग ए नाचों… हे गाणे गायिका श्रुती पाठक आणि दिव्य कुमार यांनी गायले आहे (Navratri Special Songs)
७) चित्रपट – लवयात्री
गाण्याचे नाव – चोगाडा आणि ढोलीडा
लवयात्री या २०१८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तर चोगाडा आणि ढोलीडा या दोन्ही गाण्यांच्या माध्यमातून गरबा डान्सचा स्तर काही औरच केला. हे गाणे आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. दर्शन रावल आणि असीस कुमार यांनी हे गाणे गायले आहे.
८) चित्रपट – मित्रों
गाण्याचे नाव – कंमरिया रे थारी
मित्रों या २०१८ साली प्रदर्शित झालेल्या कंमरिया रे थारी या गाण्याने जबरदस्त गुजराथी फ्लेवर दांडियामध्ये पेरला आहे. हे गाणे दर्शन रावलने गायले आहे. तर जॅकी भग्नी आणि कृतिका कामरा यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. (Navratri Special Songs)
९) चित्रपट – गंगुबाई काठियावाडी
गाण्याचे नाव – ढोलीडा
गंगुबाई काठियावाडी या २०२२ साली रिलीज झालेल्या चित्रपटातील ‘ढोलीडा’ या गाण्याचा ताल आणि लय मनाला भुलवणारा आहे. त्यामुळे यंदाची नवरात्र या गाण्याशिवाय नक्की
Discussion about this post