हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेकदा यशाची पायरी चढायची असेल तर घर आणि कुटुंब यांच्यापासून थोडे लांब जावेच लागते. हा दुरावा तात्पुरता असला तरीही बोचरा असतो. याचा अनुभव घेणाऱ्या पिल्लांच्या पंखांचं फडफडणं वादळ सुद्धा आणू शकत. इतकं बळ त्यांच्यात आलेलं असतं. असंच बळ अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या पंखातही आलं. या अनुभवाबद्दल सांगावे तितुके थोडे अशी भावना व्यक्त करणारी एक पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.
हि पोस्ट शेअर करताना अभिनेता हेमंत ढोमेने लिहिले आहे कि, ‘मी माझं एम. एससी (Masters in wildlife conservation) पूर्ण करायला दोन वर्ष केंट युनिर्वसिटी, इंग्लंडमध्ये होतो. त्या दोन वर्षांनी माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. घरापासून दूर गेल्यावर आपण स्वतःच्या अजून जवळ जातो एवढं नक्की.” तसेच घरापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं असं त्याने आपल्या इतर मित्रांनाही विचारलं आहे.’ हेमंत ढोमेची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे आणि बरीच चर्चेतही आहे.
हेमंतच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत घरापासून लांब असल्यानंतर त्यांच्या मनात काय भावना येतात त्या व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर बराच सक्रिय असणारा हेमंत आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर तसेच इंडस्ट्रीतील विविध मुद्द्यांवर कायमच भाष्य करत असतो. त्यामुळे चर्चेत असण्याची अशी अनेक कारणे त्याच्याकडे आहेत. लवकरच त्याचा ‘सनी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Discussion about this post