हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व येत्या आठवड्यात सुरु होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह एक वेगळाच जोश आहे. या शोचे तीनही पर्व चांगलेच हिट झाले होते. यांनतर आता येत्या २ ऑक्टोबर २०२२ पासून याचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्रमाणे याही पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याने यंदाच्या चावडीची उत्सुकता अधिक आहे. कधी वाद, कधी प्रेम, कधी दोस्ती, कधी भांडण, कधी दंगा, कधी मजा अशा विविध भावनांनी रंगणारा हा खेळ अनेकदा पेचात पाडतो. कितीतरी वेळा स्पर्धक आपल्याला वाटत असलेली कृती करतात आणि मग हा १०० दिवसांचा खेळ स्क्रिप्टेड तर नाही ना..? असा प्रश्न पडतो. तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः होस्टने दिले आहे.
याबद्दल बोलताना शोचे होस्ट महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘मी ‘बिग बॉससाठी काहीही तयारी केलेली नाही. हीच माझी तयारी असते. मी ठरवून काहीच करत नाही. स्पर्धक जसे वागतात त्यावरच माझी रिअॅक्शन असते. ‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून अनुभव फारच चांगला आहे. माझ्यासाठी ‘बिग बॉसची ती संपूर्ण प्रक्रिया फार आनंद देणारी असते. मला ‘बिग बॉस’ हा शो भयंकर आवडतो. मी हा शो होस्ट करेपर्यंत आधी कधीही ‘बिग बॉस’चा खेळ पाहिलेला नव्हता. त्यानंतर मी तो होस्ट करायचं म्हणून तो पाहिला. हा फारच चांगला शो आहे.’
पुढे म्हणाले कि, ‘लोक मला येऊन विचारतात की, हा शो स्क्रिप्टेड असतो का..? तर यावर मी त्यांना सांगू इच्छितो की, एखादे नाटक करताना आम्ही महिनाभर सराव करतो. इथे २४ तास आणि १०० दिव… म्हणजे किती महिने सराव करावा लागेल. बरं मला कितीतरी स्पर्धकांनी सांगितलंय की, आम्ही असं वागायचं, हे करायचं असं सगळं ठरवून जातो. पण ते होत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या काही घटना आत घडतात, त्यावर तिकडे प्रतिक्रिया उमटते. मी पूर्ण आठवडा तो शो पाहतो आणि त्यानंतर मला समजतं की कोणाची काय वाजवायची असते.’
Discussion about this post