Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट’; ‘सनी’ चित्रपटाचा टिझर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 29, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sunny
0
SHARES
96
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर दिसतो आहे. मुख्य म्हणजे या टीझरमध्ये तो शर्टलेस दिसतोय आणि कुलेस्ट बडी अशी त्याची भूमिका आहे. यामुळे टीझरपेक्षा जास्त चर्चा ललिताच्या शर्टलेस होण्याची रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे करीत आहे आणि लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. तर अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी हे ‘सनी’चे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित हे सहनिर्माते आहेत.

View this post on Instagram

A post shared by @lalit.prabhakar

या हटके टीझरमध्ये अभिनेता ललित प्रभाकर अर्थात चित्रपटातील मुख्य पात्र ‘सनी’ हा शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसते. यावेळी त्याला सतत आपण पाठीमागे काहीतरी सोडून आलोय याची जाणीव होत असते. ‘कधीकधी लांब गेल्यावर जवळच्या गोष्टींची किंमत कळते’ म्हणतात ना.. त्याचा प्रत्यय या अवस्थेतून येईल. सनीच्या मनाची सतत होणारी घालमेल आणि चलबिचल हि का आणि कशासाठी आहे..? हे समजायला त्यालाही वेळ लागतोच. पण शेवटी काय होत हे जाणून घेण्यासाठी थोडीशी वाट पाहायला लागणार आहे. कारण याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

आपल्या आगामी चित्रपटाबद्दल म्हणजेच ‘सनी’बद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला कि, ‘खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. अनेकदा असे होते, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवं जग सापडतं. आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न ‘सनी’मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा एक मजेशीर चित्रपट आहे.’

Tags: Hemant DhomeInstagram PostLalit PrabhakarTeaser ReleaseUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group