हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टेलिव्हिजन मनोरंजन विश्वातील अत्यंत चर्चेत असणारा सिंगिंग रिऍलिटी शो म्हणजेच ‘इंडियन आयडॉल’. एकेकाळी अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या या शोच्या गेल्या काही पर्वांपासुन प्रेक्षक सातत्याने आपली नाराजी दर्शवित आहेत. याहीवेळी इंडियन आयडॉलवर मोठ्या प्रमाणात टीकांचा भडीमार होताना दिसतो आहे. शोमध्ये स्पर्धक ज्यापद्धतीने निवडले जातात त्यावरून प्रेक्षकांनी परखड प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये एका स्पर्धकानंदेखील नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून नेटकऱ्यांनीदेखील शॉवर टीकास्त्र डागले आहे.
त्याचं झालं असं की, इंडियन आयडॉल शोमध्ये सहभागी होण्यासाठी विविध भागातून अनेक स्पर्धक येत असतात. यांपैकी एक रितो रिबा याला नुकताच स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यावरून शोचे प्रेक्षक आणि त्याचे चाहते चांगलेच भडकले आहेत.
वास्तविक रिबाने गायलेल्या गाण्याने समोर बसलेले परिक्षक म्हणजेच हिमेश रेशमिया, विशाल दादलानी आणि नेहा कक्कर चांगलेच खुश झाले होते. पण तरीही त्याला स्पर्धेत स्थान नाही असे सांगितले गेले. यावरून हा शो स्क्रिप्टेड आहे असा आरोप करत नेटकरी हा शो बंद करण्याची मागणी करत आहेत. अनेकांनी बॉयकॉट इंडियन आयडॉल अशी मोहीम सुरु केली आहे.
यासगळ्या प्रकरणावरुन जेम्स लिबँग नामक एका युझर्सने इंस्टावर एक व्हिडिओ शेयर केलाय. यात एक स्पर्धक येतो आपल्या गायकीने परिक्षकांना प्रभावित करतो आणि परिक्षक त्याचे कौतूक करतात. आपल्याला असे वाटते की, त्याचे सिलेक्शन झाले पण तसे होत नाही. तर दुसरीकडे आणखी एक स्पर्धक येतो आणि सांगतो, मी फार गरीब आहे, माझ्या घरी खायला काही नाही. माझ्या कुटूंबियांची परिस्थिती बिकट आहे. हे ऐकून परिक्षक त्याला शोचा भाग बनवून घेतात. शावेळी या स्पर्धकाने गायलेलय गाण्याचा आणि सुराचा काहीही संबंध नसताना त्याचे सिलेक्शन होते हि बाब खटकण्यासारखी आहे. एकंदरच काय तर युजर्सची म्हणणे आहे की, इंडियन आयडॉलमध्ये ज्या स्पर्धकांची निवड होते ती टँलेट नव्हे तर त्यांच्या परिस्थितीवरुन होते. यामुळे हा शो प्रचंड ट्रोल होतो आहे.
Discussion about this post