हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यंदाची दिवाळी त्यांच्या नवीन घरात साजरी करणार आहेत. नुकतेच शाहीद अन मीरा यांनी जुहू येथील सी-फेसिंग अपार्टमेंटमधून वरळी येथील त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. शाहिदच्या या नव्या घराची किंमत तब्बल ५८ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. (Shahid Kapoor New House).
शाहिद-मीराने वांद्रे वरळी सी-लिंक येथे नवीन आलिशान घर घेतले आहे. हे घर 2018 मध्येच विकत घेतले होते, परंतु 2019 मध्ये त्यांना त्याची मालकी मिळालीय. त्यानंतर आता ते या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.
शाहिदच्या नवीन घराची किंमत ऐकून कोणाचेही होश उडाले असतील. शाहिदने हे घर 2018 मध्येच खरेदी केले होते मात्र प्रत्यक्षात ताबा मिळायला 2019 साल उजाडले. त्यानंतर त्यांना कुटुंबासह त्या घरात शिफ्ट व्हायचे होते, पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हे जोडपे पाच दिवसांपूर्वीच आपल्या मुलांसह या नवीन घरात शिफ्ट झाले आहे. पूर्वीच्या घराप्रमाणे हे घरही वरळीच्या पॉश भागात समुद्रासमोर आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी पूजा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये फक्त घरातील लोकांचा सहभाग होता. (Shahid Kapoor New House)
शाहिद आणि मीराने स्वतःच त्यांचे नवीन घर सजवले आहे. कोरोनाच्या कालावधीमुळे त्यांना इथे शिफ्ट होण्यास विलंब झाला. याच कारणामुळे या घराच्या अंतर्गत सजावटीलाही वेळ लागला. पण आता सर्व काही सुरळीत असल्याने सर्व काम उरकून शाहिद आणि मीरा मुलांसह या घरात दाखल झाले आहेत. या घराची किंमत 58 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
शाहिदने 6 पार्किंग स्लॉट खरेदी केले आहेत (Shahid Kapoor New House)
शाहिद त्याच्या लक्झरी कार आणि बाइक कलेक्शनसाठी ओळखला जातो. शाहिदकडे जग्वार एक्सकेआर-एस, रेंज रोव्हर वोग कार, मर्सिडीज एएमजी एस-४०० सारख्या आलिशान कार आहेत. त्याचबरोबर शाहिदने यावर्षी 3 कोटींची मेबॅक कार देखील खरेदी केली आहे. आता एवढ्या महागड्या गाड्या आल्या तर त्यांची देखभालही त्याच पद्धतीने करावी लागणार आहे. यासाठी शाहिदने 360 वेस्टमध्ये 6 पार्किंग स्लॉट खरेदी केले आहेत.
शाहिद अनेकदा त्याच्या घराच्या बाल्कनीत बसून काही ना काही करताना दिसतो. या नवीन घरातही शाहिदने ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी ठेवली आहे. शाहिदने अपार्टमेंटच्या 42व्या आणि 43व्या मजल्याला जोडून हे नवीन घर बनवले आहे. मुलांच्या सुरक्षिततेमुळे शाहिद आणि मीराने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Discussion about this post